For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पीव्ही सिंधू, प्रणॉयला पराभवाचा धक्का

06:00 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
पीव्ही सिंधू  प्रणॉयला पराभवाचा धक्का
Advertisement

बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप : भारताचे एकेरीतील आव्हानही संपुष्टात

Advertisement

वृत्तसंस्था /निंगबो, चीन

गुरुवारी दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय यांना प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्याने बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमधील भारताचे आव्हान संपुष्टात आले. सिंधू व प्रणॉयच्या पराभवासह भारताचे या स्पर्धेतील आव्हान देखील संपुष्टात आले आहे. याशिवाय, महिला दुहेरीत भारतीय जोडीला हार पत्करावी लागली आहे. पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी आपला फॉर्म पुन्हा शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या सिंधूला चीनच्या सहाव्या मानांकित हान यूने 18-21, 21-13, 17-21 असे हरवले. 69 मिनिटे चाललेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. पहिल्या गेममध्ये सिंधूने शानदार सुरुवात केली आणि तिच्या अनुभवाचा उपयोग करून 8-4 अशी आघाडी घेतली, जी तिने 14-8 पर्यंत वाढवली आणि सिंधूच्या गेममध्ये चुका होऊ लागल्याने यूने पुनरागमन केले. तिने सिंधूला लांबलचक रॅलीमध्ये गुंतवून तिला थकवले आणि 15-15

Advertisement

अशी बरोबरी साधली. यानंतर तिने नेटजवळ सरस खेळ साकारत पहिला गेम 21-18 असा जिंकत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये मात्र सिंधूने आक्रमक खेळ केला. तिने आपल्या अनुभवाचा चांगला उपयोग करून 16-8 अशी आघाडी घेतली. यानंतर तिने चीनच्या यूला जराही संधी न देता हा गेम 21-13 असा जिंकत 1-1 अशी बरोबरी साधली. तिसरा व निर्णायक गेम यूने 21-17 असा जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्थान निश्चित केले. चांगली सुरुवात केल्यानंतर सिंधूने सुरुवातीला 8-4 अशी आघाडी घेतली होती. चीनच्या यूने पुन्हा एकदा आक्रमक खेळत सिंधूला चांगलेच थकवले. यामुळे सिंधूकडून चुका झाल्या व तिने 17-10 अशी आघाडी घेतली. यानंतर सिंधूने काही गुण मिळवून 20-17 पर्यंत फरक कमी केला. यूने हा गेम 21-17 असा जिंकत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. विशेष म्हणजे, सिंधूचा हा यूविरुद्ध पहिलाच पराभव ठरला आहे.

प्रणॉयचेही पॅकअप, महिला दुहेरीतही पराभव

पुरुष एकेरीच्या सामन्यात भारताच्या एचएस प्रणॉयला चिनी तैपेईच्या ली च्यून यीने 21-11, 21-18 असे सहज पराभूत केले. 43 मिनिटे चाललेल्या या सामन्यात प्रणॉयकडून अनेक चुका झाल्या, याचा फटका त्याला बसला. याशिवाय, महिला दुहेरीत भारताच्या तनिषा व अश्विनी पोनप्पा यांचे आव्हान देखील संपुष्टात आले. भारतीय जोडीला जपानच्या तिसऱ्या मानांकित नामी-चिचारु जोडीने 21-17, 21-12 असे हरवले.

Advertisement
Tags :

.