For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पीव्ही सिंधू कडव्या झुंजीनंतर बाहेर

06:03 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
पीव्ही सिंधू कडव्या झुंजीनंतर बाहेर
Advertisement

सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

भारताच्या पी. व्ही. सिंधूने शुक्रवारी येथे फ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत निसटत्या फरकाने बाहेर पडण्याच्या आधी विद्यमान ऑलिम्पिक विजेती चीनच्या चेन यू फेईला जोरदार लढत दिली. चार महिन्यांच्या दुखापतीनंतर पुनरागमन केलेल्या सिंधूने एक तास आणि 32 मिनिटांच्या या लढतीत आपला ‘स्ट्रोकप्ले’ आणि शारीरिक तंदुऊस्तीचे उत्तम प्रदर्शन घडविले. पण शेवटी तिला 24-22, 17-21, 18-21 असा पराभव पत्करावा लागला आणि दुसरे मानांकन लाभलेल्या तसेच गतविजेत्या चेनने पुढील फेरीत प्रवेश केला.

Advertisement

सिंधूने चेनविरुद्ध मागील विजय हा 2019 च्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करताना नोंदविला होता. त्यानंतर गेल्या दोन सामन्यांत चिनी खेळाडूंकडून तिचा पराभव झालेला असला, तरी एकंदर लढतींचा विचार करता सिंधूचे पारडे 6-5 असे किंचित जड होते. काही काळानंतर उच्च श्रेणीच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध लढणाऱ्या सिंधूने डाव्या गुडघ्याच्या दुखापतीचे कोणतेही चिन्ह दाखवले नाही. सदर दुखापतीमुळे तिला गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून कोर्टबाहेर राहावे लागले होते. सिंधूने या सामन्यात आक्रमक प्रदर्शन केले आणि कोर्टवरही चांगल्यारीत्या हालचाली केल्या. परंतु चेन यू फीने शेवटी मुसंडी मारली.

निर्णायक गेममध्ये चेनने दोन उत्कृष्ट फटके-एक ड्रॉप आणि लेट क्रॉस नेट हाणत 6-3 अशी आघाडी घेतली, परंतु स्मॅशचा मारा करत सिंधूने 7-7 अशी बरोबरी साधली. त्यानंतर सुरू झालेल्या रॅलीच्या सत्राद्वारे दोघांनी एकमेकांच्या मानसिक निर्धाराची चाचणी घेणे सुरू ठेवले आणि 11-11 पर्यंत परिस्थिती तशीच राहिली. त्यानंतर चेनने सलग पाच गुण घेतले, पण सिंधूने 13-16 अशी पिछाडी भरून काढण्यात यश मिळविले. त्यानंतर चेनने स्मॅशसह 19-15 अशी आघाडी घेतली, पण सिंधूने पुन्हा स्थिती 17-19 वर आणली. परंतु सिंधूने बॅकहँड नेट ड्रॉप चुकविण्यासह चेनला तीन मॅच पॉइंट दिले आणि परिस्थिती बदलली.

दुसरीकडे, दुहेरीतील स्टार खेळाडू सात्विकसाईराज रान्कीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांनी मॅन वेई चोंग आणि काई वू टी या मलेशियाच्या जोडीवर सरळ गेममध्ये विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 2023 ची चायना ओपन, मलेशिया ओपन सुपर 1000 आणि यंदाच्या मोसमातील इंडिया ओपन सुपर 750 मध्ये लागोपाठ उपविजेतेपदे मिळविलेल्या सात्विक आणि चिरागने मलेशियन जोडीचा 21-13, 21-12 असा सरळ पराभव केला.

Advertisement
Tags :

.