For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत

06:45 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
पीव्ही सिंधू  लक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

हायलो ओपन बॅडमिंटन : अनमोल खर्बचा ख्रिस्टोफर्सनला पराभवाचा धक्का

Advertisement

वृत्तसंस्था, बर्लिन

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरु असलेल्या 2026 च्या हायलो खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी एकेरीची उपांत्यपूर्व फेरीत गाठली आहे. तर महिलांच्या एकेरीमध्ये भारताच्या नवोदीत अनमोल खर्बने डेन्मार्कच्या 12 व्या मानांकित लिने ख्रिस्टोफर्सनला पराभवाचा धक्का देत शेवटच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले. आता अनमोल आणि उन्नती हुडा यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल.

Advertisement

पुरुष एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या सामन्यात लक्ष्य सेनने आपल्या देशाच्या किरण जॉर्जचा 21-15, 18-21, 21-12 अशा गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले. हा सामना 54 मिनिटे चालला होता. या लढतीमध्ये किरण जॉर्जने लक्ष्य सेनला दुसरा गेम जिंकून चांगलेच झुंजविले होते.

महिलांच्या एकेरीतील सामन्यात पीव्ही सिंधूने फ्रान्सच्या रोझी पॅनकॅसेरीचा 21-9, 21-6 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 26 मिनिटांत फडशा पाडत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना डेन्मार्कच्या अॅमेली शूल्झशी होणार आहे. महिला एकेरीतील अन्य एका सामन्यात भारताच्या अनमोल खर्बने चुरशीच्या लढतीत डेन्मार्कच्या 12 व्या मानांकित ख्रिस्टोफर्सनचा 11-21, 21-18, 25-23 अशा गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूंत स्थान मिळविले. हा सामना 63 मिनिटे चालला होता.

अन्य एका सामन्यात भारताच्या उन्नती हुडाने डेन्मार्कच्या ओस्टरगार्डचा 21-11, 21-19 असा पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले. उन्नती हुडा आणि अनमोल खर्ब यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल. मात्र कॅनडाच्या झेंगने भारताच्या मालविका बनसोडचे आव्हान 21-11, 21-17 तसेच डेन्मार्कच्या लिने किजेरफेल्टने भारताच्या ईशाराणी बारुआचे आव्हान 21-14, 21-19 असे संपुष्टात आणले.

Advertisement
Tags :

.