For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पीव्ही सिंधू उपउपांत्यपूर्व फेरीत

06:42 AM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
पीव्ही सिंधू उपउपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था, आयची नागोया

Advertisement

येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत शनिवारी बॅडमिंटन वैयक्तिक प्रकारातील महिलांच्या विभागात भारताच्या पीव्ही सिंधूने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

या स्पर्धेतील शनिवारी खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या सामन्यात पीव्ही सिंधूने चीन तैपेईच्या चियू चियानचा 21-19, 21-14 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. या विजयामुळे सिंधूने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला असून तिचा पुढील सामना जपानच्या सातव्या मानांकित मियाझेकीबरोबर होणार आहे. या सामन्यामध्ये चियानने पहिल्या गेममध्ये सिंधूला विजयासाठी चांगलेच दमविले. पण अनुभवाच्या जोरावर सिंधूने चियानचे आव्हान संपुष्टात आणले.

Advertisement

Advertisement
Tags :

.