पीव्ही सिंधू दुसऱ्या फेरीत
पुरुष एकेरी, महिला व मिश्र दुहेरीत भारताचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ ओडेन्स, डेन्मार्क
येथे सुरू असलेल्या डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले. एकेरीत फक्त पीव्ही सिंधूने दुसरी फेरी गाठली आहे. दोन वेळ ऑलिम्पिकपदक मिळविलेल्या पीव्ही सिंधूने विजयी सलामी देताना चिनी तैपेईच्या पाय यु पो हिच्यावर 21-8, 13-7 अशी आघाडी घेतली असताना पो हिने दुसऱ्या गेमवेळी माघार घेतली. त्यामुळे सिंधूला विजयी घोषित करण्यात आले. मालविका बनसो, आकर्षी कश्यप यांनाही पहिल्या फेरीत पराभूत व्हावे लागले.
महिला दुहेरीत त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांना तर बी.सुमीत रे•ाr व एन. सिक्की रे•ाr यांना मिश्र दुहेरीत चुरशीच्या लढतीनंतर पराभव स्वीकारावे लागले. त्रीसा-गायत्री यांना एका गेमची मिळालेली आघाडी राखता न आल्याने त्यांना पाचव्या मानांकित मलेशियाच्या पीयर्ली टॅन व मुरलीधरन थिनाह यांच्याकडून 21-19, 17-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला. सव्वा तास ही झुंज रंगली होती. भारतीय जोडी जागतिक क्रमवारीत 21 व्या तर मलेशियन जोडी जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. या दोन जोड्यांची आतापर्यंत सहावेळा गाठ पडली असून मलेशियने जोडीने त्यात 5 वेळा तर भारतीय जोडीला फक्त एकदाच विजय मिळविता आला. या लढतीत मात्र त्रीसा-गायत्री यांनी मलेशियन जोडीला गुणांसाठी संघर्ष करायला भाग पाडले.
मिश्र दुहेरीत सुमीत रे•ाr व सिक्की रे•ाr यांनाही एका गेमाची आघाडी टिकविता आली नाही आणि त्यांना कॅनडाच्या केव्हिन ली व इलियाना झांग यांच्याकडून 22-20, 19-21, 22-24 असे पराभूत व्हावे लागले. एक तास ही लढत रंगली होती. उन्नती हुडा व अमेरिकेची लॉरेन लॅम यांच्यात पहिल्या फेरीची लढत होत असून सतीश कुमार करुणाकरन व तैपेईचा लि यांग सु यांचीही लढत होणार आहे. मंगळवारी लक्ष्य सेन चीनच्या लु गुआंग झु याच्याकडून तीन गेम्समध्ये पराभूत झाला