महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पुतीन यांची तिसऱ्या महायुद्धाची धमकी

06:50 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय 

Advertisement

वृत्तसंस्था/ मॉस्को

Advertisement

ब्लादिमीर पुतीन यांनी रशियात झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत मोठा विजय मिळविला आहे. यामुळे पुतीन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्रपती होणार आहेत. सोमवारी निकाल जाहीर होताच पुतीन यांनी स्वत:च्या पहिल्या संबोधनात पाश्चिमात्य देशांना तिसऱ्या महायुद्धाची धमकी दिली आहे. रशिया आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो आघाडीत संघर्ष झाल्यास हे जग तिसऱ्या महायुद्धापासून केवळ एक पाऊल दूर असेल असे उद्गार पुतीन यांनी काढले आहेत.

1962 च्या क्यूबा क्षेपणास्त्र संकटानंतरच्या कालावधीत रशिया आणि पाश्चिमात्य देशांमधील संबंध सध्या सर्वात खराब स्थितीत पोहोचले आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मागील महिन्यात भविष्यात युक्रेनमध्ये स्वत:च्या देशांचे सैनिक उतरविले जाण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. याचा उल्लेख करत पुतीन यांनी नाटोने या संघर्षात उडी घेतल्यास तिसरे महायुद्ध दूर नसल्याचे उद्गार काढले आहेत.

नाटोचे सैनिक अद्याप युक्रेनमध्ये आहेत. युद्धभूमीत इंग्रजी आणि फ्रेंच भाषा अवगत असणारे अनेक जवान सक्रीय आहेत. ही चांगली गोष्ट नाही कारण मोठ्या संख्येत हे विदेशी सैनिक मृत्युमुखी पडत असल्याचा दावा पुतीन यांनी केला आहे.

युक्रेन युद्धावर चर्चेची तयारी

पुतीन यांच्या सैन्याने फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवर आक्रमण केले होते. युक्रेन युद्धासंबंधीच्या चर्चेत फ्रान्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, कारण अद्याप सर्वकाही संपलेले नाही. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, परंतु ही चर्चा केवळ शत्रूकडील दारूगोळा संपुष्टात आला आहे म्हणून होऊ नये. समोरील बाजू खरोखर गंभीर असेल आणि शांतता इच्छित असल्यास शेजारी देशांप्रमाणे चांगले संबंध राखून वागावे लागणार असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या लोकशाहीवर निशाणा

अमेरिका तसेच पाश्चिमात्य देशांकडून रशियातील निवडणुकीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यावर पुतीन यांनी टिप्पणी केली आहे. पूर्ण जग अमेरिकेत घडणारा प्रकार पाहून हसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात पूर्ण यंत्रणा वापरली जात असल्याचा आरोप पुतीन यांनी केला आहे. एलेक्सी नवाल्नी यांचा आता मृत्यू झाला असून याचे मलाही दु:ख असल्याचा दावा पुतीन यांनी केला आहे. नवाल्नी हे पुतीन यांचे रशियातील विरोधक होते. नवाल्नी यांचा रशियाच्या तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article