महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रशियाच्या राष्ट्रपतिपदी पुतीन पाचव्यांदा शपथबद्ध

06:31 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार

Advertisement

वृत्तसंस्था/ मॉस्को

Advertisement

व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी पाचव्यांदा रशियाच्या राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली. 71 वषीय पुतीन यांनी व्रेमलिनमध्ये एका भव्य समारंभात शपथ घेऊन आपल्या पाचव्या कार्यकाळाला सुऊवात केली. देशातील विरोधी पक्ष दडपल्याचा आरोप त्यांच्यावर होत असतानाच तसेच पाश्चिमात्य देशांसोबतचा संघर्ष लक्षणीयरित्या वाढला असताना पुतीन पुन्हा एकदा महत्त्वाच्या पदावर विराजमान झाले आहेत. रशियामध्ये सातत्याने आपली शक्ती मजबूत करणाऱ्या पुतीन यांना त्यांच्या कार्यकाळात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. विशेषत: युव्रेनमधील युद्धाचे संकट त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.

आर्क्टिक तुऊंगात गूढ परिस्थितीत पुतिन यांचे मुख्य प्रतिस्पर्धी अलेक्सी नवलनी यांच्या मृत्यूनंतर मार्चमध्ये देशात निवडणुका झाल्या होत्या. यादरम्यान रशियातील पुतीन यांचे बहुतांश विरोधक एकतर तुऊंगात आहेत किंवा त्यांनी देश सोडला आहे. 2022 मध्ये युव्रेनवर आक्रमण केल्यानंतर पुतीन यांची सत्तेवरची पकड मजबूत होत आहे, परंतु यामुळे रशियाला पाश्चात्य निर्बंधांनाही सामोरे जावे लागत असल्यामुळे रशियन अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी पावले उचलण्याचे आव्हान पुतीन यांच्यासमोर असणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article