For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एचएसआरपी नंबरप्लेट बसवा अन्यथा कारवाई

10:57 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
एचएसआरपी नंबरप्लेट बसवा अन्यथा कारवाई
Advertisement

विनानंबरप्लेट वाहनांचीही कडक तपासणी

Advertisement

बेळगाव : सर्व प्रकारच्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट लावणे सक्तीचे असून नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिला आहे. पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी रात्री यासंबंधी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. नंबरप्लेट नसलेल्या वाहनांचा वापर गुन्हेगारी प्रकरणात केला जात आहे. अनेक प्रकरणांच्या चौकशीत ही गोष्ट उघडकीस आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाच त्याचा फटका बसत आहे. राज्य सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व प्रकारच्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविणे सक्तीचे केले आहे. गुन्हेगारी प्रकरणात विनानंबरप्लेट वाहनांचा वापर रोखण्यासाठी वाहन तपासणी वाढविण्यात येणार आहे. ज्या वाहनांना नंबरप्लेट नसेल, तशा वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी लवकरात लवकर एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले असून नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.