महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘त्या’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घाला

10:38 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चन्नम्मा चौक येथे एसडीपीआयचे आंदोलन : मुस्लीम संघटना आक्रमक

Advertisement

बेळगाव : ‘हम दो, हमारे बारह’ हा चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. परंतु या चित्रपटात मुस्लीम समाजाच्या भावना दुखावतील असे कथानक मांडण्यात आले आहे. इस्लाम, कुराण या विषयीची चुकीची माहिती दाखविण्यात आल्याने या चित्रपटावर बंदी आणावी, अशी मागणी एसडीपीआय संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. चन्नम्मा चौक येथे मुस्लीम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. मुस्लीम समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न वारंवार होत आहे. यापूर्वीही अनेक चित्रपटांतून मुस्लीम समाजाच्या भावना दुखावतील असे प्रसंग चित्रपटात दाखविण्यात आले आहेत. त्यातच आता पुढील आठवड्यात ‘हम दो, हमारे बारह’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अनेक चुकीचे उल्लेख करण्यात आले आहेत. कुराणमधील माहितीचा चुकीचा संदर्भ चित्रपटामध्ये दाखविण्यात आला आहे. यामुळे समाजावर वाईट परिणाम होणार आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास मुस्लीम संघटना अधिक आक्रमक होतील. त्यामुळे हा चित्रपट कुठेही प्रदर्शित केला जाऊ नये, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. शुक्रवारी दुपारी चन्नम्मा चौक येथे शेकडोंच्या संख्येने मुस्लीम संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले. चित्रपटावर बंदी आणावी तसेच जे कोणी मुस्लीम समाजाच्या भावना दुखावतील त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article