दंड, करेला स्पर्धा 11, 12 रोजी
झेंडा चौकातर्फे स्पर्धांचे आयोजन
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ झेंडा चौक, मार्केट व बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रावसाहेब गोगटे स्मृती 8 व्या टॉपटेन करेला व दंडबैठका स्पर्धांचे आयोजन दि. 11 व 12 सप्टेंबर दरम्यान लोकमान्य टिळक मार्ग झेंडा चौक मार्केट येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. टॉपटेन करेला स्पर्धा बुधवार दि. 11 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली असून पहिल्या 10 विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 5000 रु., 4000 रु., 3000 रु., 2500 रु., 2000 रु., त्याशिवाय 6 ते 10 क्रमांकासाठी अनुक्रमे 1000 रु., चषक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
दंड मारण्याच्या स्पर्धा पुरूष व महिलांसाठी गुरुवार दि. 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील पुरूष महिला पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे 2500 रु., 2000 रु., व 1000 रु., तर प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह 4 ते 10 क्रमांकासाठी देण्यात येणार आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे अजित सिद्दण्णावर, एम. गंगाधर, सुनील राऊत, गौरांग गेंजी यांच्याकडे नोंदवावीत. अधिक माहितीसाठी हेमंत हावळ, अमित किल्लेकर, राजू हंगिरगेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.