For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येळ्ळूर मैदानात पुष्पेंदर लोकमान्य चषकाचा मानकरी

09:57 AM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
येळ्ळूर मैदानात पुष्पेंदर लोकमान्य चषकाचा मानकरी
Advertisement

बेळगाव : येळ्ळूर येथे श्री कलमेश्वर, श्री चांगळेश्वरी व महालक्ष्मी देवीच्या वाढदिवसा निमित्त भव्य राष्ट्रीय स्तरीय कुस्ती मैदानात पंजाबच्या पुष्पेंदर अलमगीरने विनितकुमार माराचा 15 व्या मिनिटाला घुटण्यावर आडव्या हाताची पकड मिळवित चारमुंड्या चित करून मानाचा लोकमान्य केसरी किताब पटकावित उपस्थित 50 हजारहून अधिक कुस्ती शौकीनांची मने जिंकली. येळ्ळूर महाराष्ट्र मैदानात प्रमुख कुस्ती भारत केसरी, हिंद केसरी, सिंकदर शेखला मारलेला इंडियन नेव्हीचा मल पुष्पेंदर अलमगीर पंजाब, भारत केसरी विनितकुमार मारा ही कुस्ती लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे सभासद गजानन धामणेकर, अजित गरगट्टी, सुबोध गावडे, रमाकांत कोंडूसकर, रमेश गोरल, उमेश कुरेयाळकर, भोला पाखरे, प्रदिप देसाई, दौलत कुगजी आदी मान्यवरांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली. या कुस्तीत पहिली चार मिनिटे दोन्ही मल्लांनी एकमेकाची ताकद आजमावली. सातव्या मिनिटाला विनितने एकेरीपट काढून पायाला चाट मारून हप्त्यावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून पुष्पेंदरने रितसर सुटका करून घेतली. 11 व्या मिनिटाला पुष्पेंदरने एकेरीपट काढुन विनितकुमारला खाली घेत कब्जा मिळविला. यावेळी पुष्पेंदरने मानेचा कस काढून घुटण्यावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. पण 135 किलो वजनाच्या विनितला घुटण्यावर फिरविने पुष्पेंदरला शक्य झाले नाही. त्यातून विनितने सुटका करून घेतले. 13 व्या मिनिटाला पुष्पेंदरने एकेरीपट काढून विनितवर कब्जा मिळविला. यावेळी घिश्शावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यात अपयश आल्याने पुष्पेंदरने 15 व्या मिनिटाला घुटण्या डावाची पकड मिळवित आडव्या हाताची पकड मिळवित विनितला चारीमुंड्या चित्त करीत पुष्पेंदर विनितच्या छाताड्यावर बसला विजयोत्सव साजरा केला. पुष्पेंदरला लोकमान्यचे गजानन धामणेकर, अजित गरगट्टी, सुबोधा गावडे यांच्या हस्ते लोकमान्य केसरीचा किताब देऊन त्याला गौरविण्यात आले.

Advertisement

दुसऱ्या क्रमांकाची कुस्तीचे आश्रयदाते सतीश पाटील, शिवाजी सुंठकर, आनंद पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र चॅम्पियन भरत मदने पुणे व नरेंद्र हरि आखाडा हरियाणाचा रोहित कटारीया ही कुस्ती लावण्यात आली. या कुस्तीत जवळपास 10 मिनीटे दोन्ही मल्लांनी एकमेकाची ताकद आजमावली. 11 व्या मिनिटाला भरत मदनेने एकेरीपट काढीत रोहीतला खाली घेण्याचा प्रयत्न केला. पण रोहितने त्यातून सुटका करून घेतली. 14 व्या मिनिटाला रोहित कटारियाने एकेरीपट काढून भरत मदनेला खाली घेतले व पायाला एकलांगी भरून एकेरी हाताचा कस लावून भरत मदनेला आसमान दाखविले. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन सुबोध पाटील व रोहित चौधरी ही कुस्ती सतीश कुगजी प्रमोद पाटील, आनंद पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत तिसऱ्या मिनिटाला सुबोध पाटील एकेरीपट काढून रोहित चौधरीला खाली घेत कब्जा मिळविला व पाचव्या मिनिटाला एकेरीपटावर चारीमुंड्या चित करून उपस्थितीतांची वाहवा मिळविली. चौथ्या क्रमांकाच्या कुस्ती डब्बल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व भारत केसरी रोबीन हु•ा ही कुस्ती प्रविण पाटील, नेताजी जाधव, प्रभाकर भाकोजी, कृष्णा पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली.

दुसऱ्याच मिनिटाला रोबिन हु•ाने एकेरीपट काढून कस चढवत चित्त करण्याचा प्रयत्न केला पण अनुभवी कार्तिकने सुटका करून घेतली. सहाव्या मिनिटाला रोबीन ने कार्तिकला पायाला चाट मारून कब्जा मिळवित घुटण्याची पकड घेऊन चित करण्याचा प्रयत्न करत असताना कार्तिक काटेने खालुन डंकी मारत रोबीनवर कब्जा मिळविला. आपला हुकमी डाव एकलांगी भरत असताना रोबीनने त्यातून सुटका करून घेतली. ही कुस्ती डावप्रति डावाने झुंजली. वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आली. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत कोल्हापूरचा उदयकुमार पाटील टायसनने डब्बल कर्नाटक केसरी संगमेश बिराजदारला घिस्सा डावावरती चित केले. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत नागराज बस्सीडोणीने दीपक दिल्लाचा एकचाक डावावरती पराभव केले. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत देव नरेला दिल्लीला गंभीर दुखापत झाल्याने शिवा द•ाrला विजय घोषित करण्यात आले. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रकाश इंगळगीने करण दोहा दिल्लाचा एकेरीपट काढून घुटण्यावरती फिरविताना करणला गंभीर दुखापत झाल्याने प्रकाश इंगळगीला विजय घोषित केले. नव्या क्रमांकाची कुस्ती कामेश कंग्राळीने संजु इंगळगीचा घुटण्यावर पराभव केला. दहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत किर्तीकुमार कार्वेने सुनील हंडे सांगली एकचाक डावावरती पराभव करून वाहवा मिळविली.

Advertisement

त्याचप्रमाणे प्रेम कंग्राळीने हप्त्यावर, पवन चिक्कदीनकोने एकलांगेवर बाळू घोटगेरीने घिश्यावर, प्रथमेश कंग्राळीने एकलांगीवर संतोष हारूगिरीने एकलांगीवर, पराभव केला. विक्रम तुर्केवाडी, चिन्मय येळ्ळूर, राजु शिनोळी, सुशांत साके, अल्लाब्बश दर्गा, अश्पाक तांबोळी, करण खादरवाडी, रोहण कडोली, ओंमकार सांगाव, यश कोरे गल्ली, शुभम सातनाळे, कुणाव अवचारहट्टी, दयानंदन कुगजी, श्रेयस पोस्ट हॉस्टेल, वेदांत शहापुर, शंभू शिनोळी, देवा येळ्ळूर यानी विजय मिळविले. आकर्षक कुस्तीमध्ये पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत सौरभ राशीवडे व रोहन घेवडी कर्नाटक ही कुस्ती डाव प्रतिडावाने झुंजली. पण वेळेअभावी सोडविण्यात आली.

दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत रोहित पाटील कंग्राळीने उदयराज सासने सांगलीचा घुटणा डावावरती पराभव केला. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्ती पार्थ पाटील कंग्राळीने हणमंत गंदीगवाडचा एकचाक डावावरती पराभव केले. निखिल माने सांगली, गगन अलारवाड ही कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. गद्याच्या बक्षिसासाठी ठेवण्यात आलेल्या कुस्तीत मंथन सांबराने, सचिन कोल्हापुरचा झोळी डावावरती पराभव करून गद्याचे बक्षिस पटकाविले. आखड्याचे पंच म्हणून हणमंत गुरव, दौलत कुगजी, ठेकेदार बाळाराम पाटील, शिवाजी पाटील, गणपत बन्नोसी, बाळू सुतार, मारूती कुगजी, चेतन बुध्दण्णावर, राजु कडोली, बबन येळ्ळूर आदींनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन कृष्णा चौगुले राशिवडे व जोतीराम वांजे सांगली यांनी केले. तर आपल्या हलगीच्या तालावर कृष्णांत घुले कागल, यांनी सर्व कुस्ती शौकीनांना खेळवून ठेवले.

Advertisement
Tags :

.