कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पूर्णानंद कामतीची राज्यस्तरीय निवड

10:50 AM Sep 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कर्नाटक पदवीपूर्व शिक्षण खाते व बेननस्मिथ पीयू कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हा क्रीडांगण बेळगाव येथे  पदवीपूर्व महाविद्यालयीन जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ज्योती अॅथलेटिक स्पोर्ट्सचा खेळाडू तसेच आरपीडी कॉलेजच्या विद्यार्थी पुर्णानंद कामतीने 1 सुवर्ण, 1 रौप्य व 2 कांस्यपदकसह  यश संपादन केले आहे. सदर स्पर्धेत पूर्णानंद कामतीने 800 मी. धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक प्राप्त केले. 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत त्याने तृतीय क्रमांक, 5 कि.मी. क्रॉस कंट्रीमध्ये तृतीय क्रमांक, 3000 मी. धावण्याच्या शर्यतीत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. पूर्णानंदची पदवीपूर्व महाविद्यालयीन राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला ज्येष्ठ प्रशिक्षक एल. जी. कोलेकर व अनिल गोरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे तर आरपीडी कॉलेजच्या प्राचार्य, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article