For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आचरा मासळी मार्केटात वॉटर एटीएममुळे मिळणार शुद्ध पाणी

12:25 PM Jan 02, 2024 IST | अनुजा कुडतरकर
आचरा मासळी मार्केटात वॉटर एटीएममुळे मिळणार शुद्ध पाणी
Advertisement

मासळी विक्रेत्यांसाठी आता अद्यावत शौचालयही उपलब्ध

Advertisement

आचरा | प्रतिनिधी

आचरा गावात मोठे मासळी मार्केट काही वर्षांपूर्वी चालू करण्यात आले होते. परंतु, पिण्यायोग्य शुद्ध पाणी आणि शौचालय उपलब्ध नव्हते. त्यामुळे ,मासळी विक्रेत्या महिला व ग्राहक यांना त्रास सहन करावा लागत होता. आचरा ग्रामपंचायतने ही गरज ओळखून बाजारपेठ येथील मासळी मार्केटकडे वॉटर एटीएम व अद्यावत शौचालय ,मुतारी उपलब्ध करून दिली आहे. याचे आचरा सरपंच जेरॉन फार्नांडिस व उपसरपंच संतोष मिराशी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.यावेळी एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर शवपेटीची गरज भासल्यास कणकवली ,मालवण गाठावे लागत होते. आचरा गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही शवपेटीची सुविधा उपलब्ध नव्हती. आचरा गावासाठी शवपेटीची मागणी ग्रामस्थांकडून होत होती. शवपेटीची गरज ओळखून आचरा ग्रामपंचायत मार्फत पंधरा वित्त आयोगातून आचरा गावासाठी शवपेटी खरेदी करत तीचे लोकार्पण आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते आचरा ग्रामपंचायत येथे करण्यात आले.

Advertisement

यावेळी ग्रामविस्तार अधिकारी प्रकाश कदम, ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, महेंद्र घाडी, पंकज आचरेकर, अनुष्का गावकर, किशोरी आचरेकर, चंद्रकांत कदम, हर्षदा पुजारे, श्रुती सांवत, व्यापारी संघटना अध्यक्ष वामन आचरेकर, खजिनदार जयप्रकाश परुळेकर, सचिन हडकर, बाळा घाडी, वीरू पुजारे, सुधा कोदे, गजू गावकर, लवू घाडी, उदय घाडी अन्य ग्रामस्थ, व्यापारी उपस्थित होते.

वॉटर एटीएममुळे मिळणार सवलतीच्या दरात शुद्ध पाणी

ग्रामपंचायत मार्फत बसवण्यात आलेल्या वॉटर एटीएमद्वारे थंड पाणी व साधे पाणी असे एकत्र दोन एटीएम सुविधा करण्यात देण्यात आल्या आहेत. यामधून थंड पाणी एक रुपया 500 मिली, दोन रुपया एक लिटर, दहा रुपयामध्ये पाच लिटर, व एटीएम कार्डद्वारे वीस रुपयांमध्ये 18 लिटर पाणी मिळणार आहे. तसेच साधे शुद्ध पाणी उपलब्ध असणार आहे. तसेच ज्या लोकांना नियमित पाणी आवश्यक आहे त्यांच्यासाठी एटीएम कार्ड चा शुल्क घेऊन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे मासळी विक्रेते, ग्रामस्थ व व्यापारी वर्गाला शुद्ध मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्यामुळे त्यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.