तेल कंपन्यांच्या समभागांची खरेदी
06:43 AM Mar 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
तेल व गॅस क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग शुक्रवारी चांगले तेजीत असताना दिसले. कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली कपात याचा तेल मार्केटिंग कंपन्यांनी फायदा उठवलेला दिसून आला. या कंपन्यांचे समभाग शुक्रवारी साडेतीन टक्क्यांपर्यंत वाढलेले दिसून आले. याच दरम्यान निफ्टी ऑईल अॅण्ड गॅस निर्देशांक 1.6 टक्के वाढला होता. दुसरीकडे एनर्जी निर्देशांकसुद्धा सुमारे 2 टक्के वाढला होता. हिंदुस्थान पेट्रोलियम 3.4 टक्के, इंडियन ऑईल कॉर्पेरेशन 2.5 टक्के इतका तेजीत होता. यासोबत बीपीसीएलचा समभाग 1 टक्का इतका वाढला होता.
Advertisement
Advertisement