For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेकडून रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीची खरेदी

06:40 AM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेकडून रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीची खरेदी
Advertisement

अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी दिली माहिती : भारत खरेदी करणार ‘जॅवलिन’

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारत अमेरिकेकडून जॅवलिन रणगाडाभेदी क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याची योजना आखत आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे. भारत-अमेरिका संबंधांसाठी हे मोठे पाऊल असून दोन्ही देशांदरम्यान जॅवलिन रणगाडाभेदी प्रणालीचे संयुक्तपणे उत्पादन केले जाण्याची शक्यता असल्याचे गोर यांनी सांगितले आहे.

Advertisement

जॅवलिन एक पोर्टेल रणगाडाभेदी क्षेपणास्त्र प्रणाली असून सैनिक ती खांद्यांवरून डागू शकतो. याचे वैशिष्ट्या म्हणजे या प्रणालीला वेगवेगळ्या भागांमध्ये जलदपणे तैनात केले जाऊ शकते. पर्वतीय भागांपासून खुल्या मैदानापर्यंत याचा वापर केला जाऊ शकतो. ही प्रणाली रणगाडे आणि चिलखती वाहनांना लक्ष्य करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे.

भारताचा जॅवलिन खरेदी करण्याचा निर्णय दोन्ही देशांच्या संरक्षण संबंधांना आणखी मजबूत करणार आहे. या व्यवहारामुळे भारतात जॅवलिनच्या सह-उत्पादनाचा मार्गही खुला होऊ शकतो असे गोर म्हणाले. मे 2026 मध्ये शांगरी-ला डायलॉगदरम्यान अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांकडून करण्यात आलेल्या वक्तव्यांचा गोर यांनी उल्लेख केला.

भारत दीर्घकाळापासून स्वत:च्या सैन्याच्या रणगाडाभेदी क्षमतेला मजबूत करण्यावर काम करत आहे. अशास्थितीत जॅवलिन प्रणालीच्या संभाव्य खरेदीला याच रणनीतिशी जोडून पाहिले जात आहे. खासकरून सीमावर्ती भागांमध्ये रणगाडे आणि चिलखती वाहनांना लक्ष्य करण्यासाठी अशाप्रकारची शस्त्रप्रणाली महत्त्वपूर्ण मानली जाते.

भारत आणि अमेरिकेदरम्यान या क्यवहारात अनेक शस्त्रप्रणाली खरेदी करण्याची योजना आहे. यात भारत 100 एफजीएम-148 जॅवलिन राउंड, एक जॅवलिन एफजीएम-147 क्षेपणास्त्र-फ्लाय-टू-बाय आधारावर आणखी 25 जॅवलिन लाइटवेट कमांड लाँच युनिट किंवा जॅवलिन ब्लॉक 1 कमांड लाँच युनिट खरेदी करणार आहे. जॅवलिन क्षेपणास्त्र प्रणालीची निर्मिती अमेरिकेतील रेथियॉन आणि लॉकहीड मार्टिन या कंपन्यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.