महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंजाब संघाचे नवे प्रशिक्षक जाफर

06:45 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

2024-25 च्या क्रिकेट हंगामासाठी मुंबईचा माजी सलामीचा फलंदाज वासिम जाफरची पंजाब संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंजाब क्रिकेट संघटनेचे सचिव दिलशेर खन्ना यांनी ही घोषणा केली आहे.

Advertisement

पंजाब क्रिकेट संघटना आणि वासिम जाफर यांच्यात हा नवा करार लवकरच केला जाणार आहे. 46 वर्षीय वासिम जाफर आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी 2019 ते 2021 या कालावधीत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे फलंदाज प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी पंजाब संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज अविष्कार साळवीकडे सोपविण्यात आली होती. साळवीच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी पंजाब क्रिकेट संघाने सय्यद मुस्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. वासिम जाफरने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 31 कसोटीत भारताचे प्रतिनिधीत्व करताना 5 शतके आणि 2 अर्धशतकांसह 1944 धावा जमविल्या आहेत. वासिम जाफरकडे सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदाची जबाबदारी आहे. रणजी स्पर्धेमध्ये वासिम जाफरने मुंबई संघाकडून खेळताना 260 प्रथम श्रेणी सामन्यात 19,410 धावा जमविल्या असून त्यामध्ये 57 शतकांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article