For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंजाब, उत्तरप्रदेश, बंगाल, अरुणाचल विजयी

06:26 AM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंजाब  उत्तरप्रदेश  बंगाल  अरुणाचल विजयी
Advertisement

उपकनिष्ठ पुरूषांची हॉकी स्पर्धा, उत्तरप्रदेशच्या शाहरुख अलीचे 11 गोल

Advertisement

वृत्तसंस्था, राजगीर

हॉकी इंडियाच्या 16 व्या उपकनिष्ठ पुरूषांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत झालेल्या विविध सामन्यात पंजाब, उत्तरप्रदेश, बंगाल, अरुणाचलप्रदेश, झारखंड यांनी प्रतिस्पर्ध्यावर विजय नोंदविले.

Advertisement

अ विभागातील अ गटातील झालेल्या सामन्यात पंजाबने महाराष्ट्राचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. पंजाबतर्फे संगतसिंग आणि आकाशदीप यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. क गटातील सामन्यातील उत्तरप्रदेशने मणिपूरचा 17-1 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या सामन्यात उत्तरप्रदेशच्या शाहरुख अलीने 11 गोल नोंदविण्याचा पराक्रम केला. या सामन्यात त्याने 5, 22, 23, 24, 29, 33, 35, 36, 48, 49, 59 व्या मिनिटाला गोल नोंदविले. तर नितीश यादवने 3 आणि 18 व्या मिनिटाला असे दोन गोल तर कर्णधार कुशावह केतन आणि करण धनक यांनी प्रत्येकी 1 गोल केला. मणिपूरतर्फे एकमेव गोल 14 व्या मिनिटाला मणिमेतुमने नोंदविला.

ड गटातील खेळविण्यात आलेल्या सामन्यात मध्यप्रदेशने केरळवर 10-1 अशा गोलफरकाने विजय मिळविला. केरळ संघातील रेयान उल हक याने शानदार हॅट्ट्रीक तर गेझी खानने 2 गोल तसेच कर्णधार अनिश बहुत्रा, आयुष सिंग लोधी, करण गौतम, दीपक सिंग, देवराज प्रजापत यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. ब गटातील झालेल्या सामन्यात झारखंडने दादरा नगर-हवेलीचा 1-0 असा निसटता पराभव केला. सामन्यातील एकमेव गोल आशिषने 22 व्या मिनिटाला नोंदविला.

अ गटातील अन्य एका सामन्यात बंगालने गुजरातचा 18 गोलनी पराभव केला. या सामन्यात बंगालतर्फे मुन्नाकुमार सिंगने सहा गोल तर सुजल तुरी आणि सुजल वाल्मिकी यांनी प्रत्येकी 3 गोल नोंदविले. रिशव रे आणि रतन बिंद यांनी प्रत्येकी 2 गोल केले. कर्णधार रिजू बार आणि अभिषेक ठाकुर यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. ब गटातील अन्य एका सामन्यात अरुणाचलप्रदेशने छत्तीसगडवर 5-3 अशा गोलांनी विजय मिळविला. अरुणाचल प्रदेशतर्फे राजबर शुभमने तीन गोल तर अश्विन पटेल आणि मोहीत यादव यांनी प्रत्येकी 1 गोल केला.

Advertisement
Tags :

.