For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंजाबला आज लखनौविरुद्ध विजयाची गरज

06:31 AM May 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंजाबला आज लखनौविरुद्ध विजयाची गरज
Advertisement

वृत्तसंस्था

Advertisement

लखनौ : आज शनिवारी एकाना स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएल सामन्यात आधीच स्पर्धेतून बाहेर पडलेल्या लखनौ सुपर जायंट्सविऊद्ध खेळताना पंजाब किंग्सला आपली विनाशकारी घसरण थांबवण्यासाठी आणि प्लेऑफच्या मावळत्या आशा जिवंत ठेवण्यासाठी नेत्रदीपक कामगिरी करावी लागेल.

25 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविऊद्ध 265 धावांचा विक्रमी पाठलाग केल्यापासून पंजाबची मोहीम नाट्यामयरीत्या कोलमडली आहे. मध्यावधीपर्यंत अपराजित राहिललने आणि सातपैकी सहा सामने जिंकल्याने ते विजेतेपदाचे खरे दावेदार वाटत असताना मागील हंगामातील या उपविजेत्यांना सलग सहा पराभवांना सामोरे जावे लागले आहे. यामुळे त्यांच्या प्लेऑफच्या आशा अगदीच क्षीण झाल्या आहेत. आता पाचव्या स्थानावर असलेल्या पंजाबला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी केवळ शनिवारी येथे होणाऱ्या त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात एलएसजीला हरवून भागणार नाही, तर रविवारच्या दोन सामन्यांवर (मुंबई इंडियन्स वि. राजस्थान आणि केकेआर वि. दिल्ली कॅपिटल्स) देखील अवलंबून राहावे लागेल.

Advertisement

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ आशा करेल की, राजस्थान आणि कोलकाता नाइट रायडर्स हे दोन्ही संघ आपापले सामने हरतील. राजस्थान रॉयल्सने मुंबईवर विजय मिळवल्यास पंजाबच्या आशा अधिकृतपणे संपुष्टात येतील, तर केकेआरने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवल्यास नेट रन रेट महत्त्वाचा ठरू शकतो. सध्या नेट रन रेटमध्ये पंजाब केकेआरपेक्षा किंचित पुढे आहे. परंतु या सर्व गोष्टींचा विचार करण्यापूर्वी पंजाबला दीर्घकाळच्या खराब कामगिरीनंतर आपला फॉर्म परत मिळवणे आवश्यक आहे. सदर घसरणीमुळे संघाच्या सर्व विभागांमधील त्रुटी उघड झाल्या आहेत.

प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग आणि कूपर कॉनोली यांची आक्रमक वरची फळी हंगामाच्या पूर्वार्धात संघाला जशी स्फोटक सुऊवात मिळाली होती तशी ती देण्यात अपयशी ठरली आहे. प्रियांशने आपल्या गेल्या सात डावांमध्ये फक्त एक अर्धशतक झळकावले आहे आणि मागील सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता, तर प्रभसिमरनलाही आपल्या गेल्या पाच डावांमध्ये फक्त एक अर्धशतक झळकावता आले असून सातत्य राखण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे.

कॉनोलीने काही प्रमाणात झलक दाखवली आहे, परंतु मिळालेल्या चांगल्या सुऊवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आलेले नाही. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सातत्याने आघाडीवर राहिल्यानंतरही संघाच्या पराभवाच्या मालिकेदरम्यान कर्णधार अय्यरच्या कामगिरीतही मोठी घसरण झाली आहे. या सहा पराभवांच्या सामन्यांमध्ये त्याला केवळ एकदाच पन्नास धावांचा टप्पा ओलांडता आला आहे. दिल्लीविऊद्ध यशस्वी पाठलाग करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या मधल्या फळीनेही आपला सूर गमावला आह्.े दुसरीकडे त्यांच्या गोलंदाजी विभागाने डावाच्या सुऊवातीला आणि अखेरीस अशा दोन्ही टप्प्यांवर सातत्याने धावा बहाल केल्या आहेत. क्षेत्ररक्षणातील त्रुटींमुळेही त्यांना मोठा फटका बसला आहे. विशेषत: निर्णायक क्षणी झेल सोडणे खूपच महागात पडले आहे.

दुसरीकडे, लखनौसाठी हा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला असून गेल्या 10 सामन्यांत केवळ दोनच विजय मिळवता आल्यामुळे ते आता ‘प्ले-ऑफ’च्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्यांच्या मागील सामन्यात जयपूर येथे त्यांना राजस्थान रॉयल्सकडून सात गडी राखून पराभव पत्करावा लागला. तरीही यजमान संघाचा आत्मविश्वास एकाना स्टेडियमवरील त्यांच्या अलीकडील कामगिरीतून नक्कीच वाढेल. कारण याच मैदानावर त्यांनी आपले मागील दोन्ही विजय रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्याविऊद्ध नोंदवले होते.

लखनौसाठी सर्वांत जमेची बाजू म्हणजे डावाची सुऊवात करणारी ऑस्ट्रेलियन जोडी मिचेल मार्श आणि जोश इंग्लिश यांचा सध्याचा बहारदार फॉर्म. त्यामुळे आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर या हंगामाचा शेवट सकारात्मक पद्धतीने करायचा असल्यास या जोडीची कामगिरी पुन्हा एकदा अत्यंत निर्णायक ठरेल. कर्णधार रिषभ पंत, ज्याने आतापर्यंत केवळ एक अर्धशतक झळकावून निराशाजनक हंगाम अनुभवला आहे, तो देखील या हंगामाचा शेवट चांगल्या प्रकारे करण्याची आशा बाळगेल. गोलंदाजी विभागात मागील सामना हुकलेला अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुनरागमन करतो की नाही हे पाहावे लागेल.

संघ-पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, कूपर कॉनोली, सूर्यांश शेडगे, शशांक सिंग, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, इम्पॅक्ट प्लेयर : लॉकी फर्ग्युसन

लखनौ सुपर जायंट्स : रिषभ पंत (कर्णधार), मिचेल मार्श, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, अब्दुल समद, मुकुल चौधरी वा आयुष बदोनी, शाहबाज अहमद, मोहसीन खान, मयंक यादव वा मोहम्मद शमी, आकाश महाराज सिंग, प्रिन्स यादव. इम्पॅक्ट प्लेयर : दिग्वेश राठी.

सामन्याची वेळ : सायं. 7.30 वा.

Advertisement
Tags :

.