For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंजाब किंग्स संघाची विजयी सलामी

06:58 AM Apr 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंजाब किंग्स संघाची विजयी सलामी
Advertisement

गुजरात टायटन्सवर 3 गड्यांनी मात,  सामनावीर कोनोलीचे आयपीएल पदार्पणतच नाबाद अर्धशतक, विशाखचे 3 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/मुल्लनपूर

कूपर कोनोलीने आयपीएल स्पर्धेतील पदार्पणातच झळकविलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर तसेच यजुवेंद्र चहल आणि विशाख यांच्या फिरकी गोलंदाजीच्या साहाय्याने किंग्ज इलेव्हन पंजाबने विजयी सलामी देताना गुजरात टायटन्सचा 5 चेंडू बाकी ठेवून 3 गड्यांनी पराभव केला.

Advertisement

या सामन्यात पंजाब संघाने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजी दिली. दरम्यान गुजरातच्या डावाला चांगली सुरूवात होवूनही मधल्याफळीतील फलंदाज पंजाबच्या गोलंदाजीसमोर लवकर बाद झाले. त्यामुळे त्यांना 20 षटकांत 6 बाद 162 धावांपर्यंत मजल मारता आली. 14 षटकांत गुजरातची स्थिती 3 बाद 119 अशी समाधानकारक होती. पण त्यानंतर शेवटच्या 6 षटकांत गुजरातने आणखी तीन गडी गमविताना केवळ 43 धावा जमविल्या. पंजाबच्या विशाख आणि यजुवेंद्र चहल या फिरकी गोलंदाजांनी गुजरातला फटकेबाजीपासून शेवटपर्यंत रोखले. कर्णधार गिलने 27 चेंडूत 6 चौकारांसह 39, बटलरने 33 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 38, फिलीप्सने 17 चेंडूत 1 षटकार 1 चौकारासह 25, वॉशिंग्टन सुंदरने 2 चौकारांसह 18 तर तेवातियाने 1 चौकारासह नाबाद 11 धावा जमविल्या. गिल आणि बटलर यांनी दुसऱ्या गड्यासाठी 46 धावांची भर घातली. पंजाबतर्फे विशाखने 34 धावांत 3 तर चहलने 28 धावांत 2 तसेच जेन्सनने 20 धावांत 1 गडी बाद केला. गुजरात टायटन्सने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 54 धावा जमविताना 1 गडी गमविला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाब संघाकडून आयपीएल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या कुपर कोनोलीने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 44 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकारांसह  नाबाद 72 धावा झळकविल्या. प्रभसिमरन सिंगने 24 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारासह 37 धावा जमविताना कोनोली समवेत दुसऱ्या गड्यासाठी 76 धावांची भागिदारी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने 11 चेंडूत 2 षटकारासह 18 धावा जमविल्या. शशांक सिंग 4 धावांवर बाद झाला. स्टोइनिसला खाते उघडता आले नाही. जेन्सनने 1 षटकारासह 9 धावा जमविल्या. बार्टलेटने 5 चंडूत 1 षटकारासह नाबाद 11 धावा केल्या. गुजरात टायटन्सतर्फे प्रसिद्ध कृष्णाने 29 धावांत 3 तर रबाडा, अशोक शर्मा, रशिद खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पंजाब संघाने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 55 धावा जमविताना 1 गडी गमविला. कोनोलीने 34 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह अर्धशतक झळकविले.

संक्षिप्त धावफलक : गुजरात टायटन्स 20 षटकांत 6 बाद 162 (गिल 39, बटलर 38, फिलिप्स 25, वॉशिंग्टन सुंदर 18, सुदर्शन 13, विशाख 3-34, यजुवेंद्र चहल 2-28, जेन्सन 1-20), किंग्ज इलेव्हन पंजाब 19.1 षटकांत 7 बाद 165 (कोनोली नाबाद 72, प्रभसिमरन सिंग 37, श्रेयस अय्यर 18, बार्टलेट नाबाद 11, प्रसिद्ध कृष्णा 3-29, रबाडा, अशोक शर्मा, रशिद खान व वॉशिंग्टन सुंदर प्रत्येकी 1 बळी).

-कूपर कोनोलीने आयपीएल पदार्पणातच उमटवला ठसा

-विजयकुमार विशाख व गुजरातच्या प्रसिद्ध कृष्णाचे 3 बळी

-आतापर्यंतच्या चार सामन्यांत यजमान संघाचा विजय

-चारही सामन्यांत नाणेफेक जिंकणारा व पाठलाग करणारा संघ विजयी.

धावफलक

गुजरात टायटन्स

फलंदाज           बाद होण्याची पद्धत           धावा         चेंडू

साई सुदर्शन     झे. अय्यर गो. जॅन्सेन           13           11

शुभमन गिल      झे. कोनोली गो. चहल         39           27

जोस बटलर    झे. बार्टलेट गो. चहल             38          33

ग्लेन फिलिप्स       झे. जॅन्सेन गो. विशाख       25        17

वाशिंग्टन सुंदर      झे. अर्शदीप गो. विशाख   18        16

राहुल तेवातिया      नाबाद                          11     10

अवांतर             14

एकूण       20 षटकांत     6 बाद 162

गडी बाद होण्याचा क्रम : 1-37, 2-83, 3-119, 4-129, 5-144, 6-150.

गोलंदाजी

विजयकुमार विशाख    4-0-34-3

युजवेंद्र चहल             4-0-28-2

मार्को जॅन्सेन            4-0-20-1.

पंजाब किंग्स

प्रियांश आर्या झे. अशोक शर्मा गो. रबाडा  7      8      0।1

प्रभसिमरन सिंग   झे. पी. कृष्णा गो. रशिद खान     37    24    1।4

कूपर कोनोली         नाबाद                   72    44

श्रेयस अय्यर झे. सुंदर गो. पी. कृष्णा         18    11

झेवियर बार्टलेट     नाबाद                     11     5

अवांतर             4

एकूण       19.1 षटकांत  7 बाद 165

गडी बाद होण्याचा क्रम : 1-7, 2-83, 3-110, 4-113, 5-118, 6-118, 7-144.

गोलंदाजी

कागिसो रबाडा       3-0-34-1

अशोक शर्मा          3-0-31-1

रशिद खान          4-0-29-1

वाशिंग्टन सुंदर      3.1-0-27-1

प्रसिद्ध कृष्णा       4-0-29-3.

Advertisement
Tags :

.