पंजाब किंग्सविऊद्ध आज हैदराबादसमोर पुनरागमनाचे लक्ष्य
वृत्तसंस्था/ हैदराबाद
चिंताजनक घसरणीला तोंड द्यावा लागलेला सनरायझर्स हैदराबाद आज शनिवारी येथे होणाऱ्या त्यांच्या आयपीएल सामन्यात पॉवरपॅक पंजाब किंग्सचा सामना करताना पुनरागमन करण्यास उत्सुक असेल. गेल्या हंगामात अंतिम फेरीत पोहोचलेल्या हैदराबादने 2025 च्या मोहिमेची जोरदार सुऊवात करताना 286 धावा जमविण्याबरोबर राजस्थान रॉयल्सचा 44 धावांनी पराभव केला होता. त्यांच्याकडे असलेली स्फोटक फलंदाजी फळी पाहता ‘ऑरेंज आर्मी’ 300 धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला संघ बनण्यास सज्ज दिसत होता.
परंतु त्यानंतर अतिआक्रमक दृष्टिकोन त्यांना नडलेला आहे. मागील तीन सामन्यांमध्ये 163, 120 आणि 152 अशा निराशाजनक धावसंख्येसह त्यांना पराभव पत्करावे लागले आहेत आणि गुणतालिकेत ते तळाशी फेकले गेले आहेत. त्यांचा नेट रन रेट उणे 1.629 इतका सर्वांत वाईट आहे. फलंदाजीमध्ये सनरायझर्स हैदराबादला ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यासारख्या त्यांच्या मोठ्या नावांपेक्षा चांगली कामगिरी होण्याची खूप गरज आहे. गेल्या हंगामात स्फोटक सुऊवात करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे हेड आणि शर्मा या वर्षी त्यांची लय मिळवण्यात अपयशी ठरले आहेत.
सलामीलाच नाबाद शतक केल्यानंतर किशनला लय मिळालेली नाही तसेच मधल्या फळीचा मुख्य आधारस्तंभ क्लासेनलाही अद्याप चमक दाखविता आलेला नाही. तरीही संघ त्यांच्या आक्रमक धोरणाला चिकटून असल्याचे दिसून येते. हैदराबादचा वेगवान गोलंदाजी विभागही प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलेला आहे. पॅट कमिन्स, मोहम्मद शमी आणि हर्षल पटेलसारखे अनुभवी गोलंदाज असूनही हैदराबादला सुरुवातीस यश मिळविण्याच्या बाबतीत संघर्ष करावा लागला आहे. मधल्या षटकांमध्येही दबाव निर्माण करण्यात किंवा महत्त्वाचे यश मिळविण्यात ते अपयशी ठरले आहेत.
याउलट श्रेयस अय्यरच्या नवीन नेतृत्वाखालील पंजाब किंग्स वेगाने वाटचाल करत आहे. अय्यरने फलंदाजीत कर्णधारास साजेशी कामगिरी करण्याबरोबर संघाला चार सामन्यांत तीन विजय मिळवून दिले आहेत आणि ते चौथ्या स्थानावर आहेत. त्यांच्या ‘फायरपॉवर’मध्ये तऊण प्रियांश आर्यची भर पडली आहे. तसेच त्यांच्या अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युजवेंद्र चहल आणि मार्को जॅनसेन यांनी गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे.
संघ : सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, सचिन बेबी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, हर्षल पटेल, कामिंदू मेंडिस, विआन मुल्डर, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रे•ाr, मोहम्मद शमी, राहुल चाहर, अॅडम झॅम्पा, सिमरजित सिंग, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट आणि एशान मलिंगा.
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, वैशाख विजयकुमार, यश ठाकूर, हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, मार्को जॅनसेन, लॉकी फर्ग्युसन, जोश इंग्लिस, झेवियर बार्टलेट, कुलदीप सेन, पायला अविनाश, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, हरनूर पन्नू, एरोन हार्डी, प्रियांश आर्य, अजमतुल्ला उमरझाई.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.