For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंजाब किंग्सची पराभवाची हॅट्ट्रिक

06:58 AM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंजाब किंग्सची पराभवाची हॅट्ट्रिक
Advertisement

33 धावांनी विजय मिळवित हैदराबाद अग्रस्थानी, क्लासेन-इशान किशनची अर्धशतके, कमिन्स सामनावीर

Advertisement

वृत्तसंस्था / हैदराबाद

इशान किशन व हेन्रिक क्लासेन यांची अर्धशतके आणि भेदक गोलंदाजीच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएलमधील सामन्यात पंजाब किंग्सवर 33 धावांनी विजय मिळवित 14 गुणांसह गुणतक्त्यात अग्रस्थान पटकावले. 34 धावांत 2 बळी व दोन झेल टिपणाऱ्या कर्णधार पॅट कमिन्सला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

Advertisement

पंजाबने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजी दिली. हेन्रिक क्लासेनने सातत्य कायम राखत 43 चेंडूत 69 धावा फटकावल्या तर इशान किशनने 32 चेंडूत 55 धावा फटकावत त्याला मोलाची साथ दिल्याने हैदराबादने 20 षटकांत 4 बाद 235 धावांचा डोंगर उभारला. पंजाबने गचाळ क्षेत्ररक्षण करीत तीन सोपे झेल सोडले, त्याचा पुरेपूर लाभ हैदराबादच्या फलंदाजांनी उठविला. त्यानंतर कमिन्स व त्यांचा या मोसमातील सर्वोत्तम गोलंदाज इशान मलिंगा यांनी ब्रेकथ्रू मिळवून देताना 21 निर्धाव चेंडूही टाकले. त्यामुळे पंजाबला 20 षटकांत 7 बाद 202 धावांपर्यंतच मजल मारता आली. कूपर कॉनोलीने एकाकी लढत देत 59 चेंडूत नाबाद 107 धावा फटकावल्या. टी-20 मधील त्याचे हे पहिलेच शतक होते. पॉवरप्लेमध्येच त्यांचे चार फलंदाज बाद झाल्याने पंजाबला त्यातून अखेरपर्यंत सावरता आले नाही. स्टोइनिसने 14 चेंडूत 28 व सूर्यांश शेडगेने 17 चेंडूत 25 तसेच मार्को जान्सेनने 19 धावा जमविल्या. इतरांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. कमिन्स व शिवांग कुमार यांनी प्रत्येकी 2 तर नितीश कुमार रे•ाr, इशान मलिंगा, साकिब हुसेन यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला. हैदराबादमधील पंजाबचा हा सलग नववा पराभव आहे.

हैदराबादला आता उर्वरित तीनपैकी एक सामना जिंकला तरी ते 16 गुणांवर पोहोचत प्लेऑफमध्ये स्थान मिळवतील.

कमिन्सने प्रियांश आर्यचे तंत्र उघडे पाडत त्याला बाद केल्यानंतर हैदराबादने अखेरपर्यंत पकड ढिली होऊ दिली नाही. प्रभसिमरन सिंग, कर्णधार श्रेयस अय्यरही स्वस्तात बाद झाले. दोन पॉवरप्लेमध्येच या सामन्याचा निकाल निश्चित झाला. अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी जोरदार फटकेबाजी करीत सहा षटकांच्या पॉवरप्लेमध्ये 1 बाद 79 धावा फटकावल्या तर पंजाबने केवळ 3 बाद 57 धावा जमविल्या. पंजाबच्या पराभवाला खराब क्षेत्ररक्षणही कारणीभूत ठरले. किशन-क्लासेन यांना तीन वेळा जीवदाने मिळाली, तर एकदा यष्टिचीत करण्याची संधीही पंजाबने दवडली. अभिषेकने 13 चेंडूत 35, हेडने 19 चेंडूत 38 धावा फटकावल्या तर अंतिम टप्प्यात नितीश रे•ाrने 13 चेंडूत झटपट नाबाद 29 धावा झोडपल्या. हैदराबादच्या फलंदाजांनी एकूण 17 षटकार ठोकले. त्यात अभिषेकचे 4, हेडचे 3, किशन व क्लासेन यांच्या प्रत्येकी 4 षटकारांचा समावेश होता.

संक्षिप्त धावफलक : सनरायझर्स हैदराबाद 20 षटकांत 4 बाद 235 : अभिषेक शर्मा 13 चेंडूत 35, हेड 19 चेंडूत 38, किशन 32 चेंडूत 55, क्लासेन 43 चेंडूत 69, नितीश रे•ाr 13 चेंडूत 29, अवांतर 9. अर्शदीप सिंग 1-43, फर्ग्युसन 1-41, युजवेंद्र चहल 1-32, विजय कुमार वैशाक 1-54.

पंजाब किंग्स 20 षटकांत 7 बाद 202 : कूपर कॉनोली 59 चेंडूत 7 चौकार, 8 षटकारांसह नाबाद 107, स्टोइनिस 14 चेंडूत 28, सूर्यांश शेडगे 17 चेंडूत 25, जान्सेन 16 चेंडूत 19, अवांतर 9. कमिन्स 2-34, शिवांग कुमार 2-45, नितीश कुमार रे•ाr 1-11, इशान मलिंगा 1-36, साकिब हुसेन 1-40.

-पंजाबचा सलग तिसरा, तर हैदराबादचा सलग तिसरा विजय

-हैदराबादमध्ये पंजाबचा सलग नववा पराभव

-कोनोलीचे पहिले टी-20 शतक

-हैदराबादला प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी एका विजयाची गरज.

Advertisement
Tags :

.