For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंजाबला 112 धावांची आघाडी

01:20 AM Feb 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंजाबला 112 धावांची आघाडी
Advertisement

वृत्तसंस्था/ मोहाली

Advertisement

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरु असलेल्या इलाईट ब गटातील सामन्यात शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर कर्नाटका विरुद्ध पंजाबने 112 धावांची आघाडी मिळवली आहे.

या सामन्यात पंजाबचा पहिला डाव 309 धावांवर समाप्त झाल्यानंतर कर्नाटकाने पहिल्या डावात 316 धावा जमवित नाममात्र 7 धावांची आघाडी मिळवली. कर्नाटकाच्या पहिल्या डावात केएल राहुल आणि श्रेयस गोपाल यांनी अर्धशतके झळकाविली. राहुलने 9 चौकारांसह 59 तर गोपालने 6 चौकारांसह 77 धावा झळकाविल्या. अगरवालने 6 चौकारांसह 46, अनिशने 3 चौकारांसह 32, कृतिक कृष्णाने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 28, तर विद्याधर पाटीलने 6 चौकारांसह 34 धावा जमविल्या. पंजाबतर्फे ब्रारने 4 तर सुखदीप सिंगने 3 व अनमोलजीत सिंगने 2 गडी बाद केले. त्यानंतर पंजाबने दुसऱ्या डावात दिवसअखेर 45 षटकात 3 बाद 119 धावा जमविल्या. कर्णधार उदय सहारण 2 षटकार आणि 4 चौकारांसह 63 धावांवर खेळत आहे. गर्गने 4 चौकारांसह 33 धावा जमविल्या.

Advertisement

संक्षिप्त धावफलक - पंजाब प. डाव सर्वबाद 309, कर्नाटक प. डाव सर्वबाद 316 (केएल राहुल 59, अनिश 32, अगरवाल 46, श्रेयस गोपाल 77, विद्याधर पाटील  34, हरप्रित ब्रार 4-125, सुखदीप सिंग 3-42, अनमोलजित सिंग 2-62). पंजाब दु. डाव 3 बाद 119 (उदय सहारण खेळत आहे 63, गर्ग 33).

Advertisement
Tags :

.