For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंजाब शासनानकडू भारताच्या 14 हॉकीपटूंचा गौरव

06:22 AM May 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंजाब शासनानकडू भारताच्या 14 हॉकीपटूंचा गौरव
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

भारतीय हॉकी क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणाऱ्या 14 हॉकीपटूंचा पंजाब शासनातर्फे महाराजा रणजित सिंग पुरस्काराने गौरव करण्यात आला. पंजाब शासनातर्फे भारतीय हॉकीपटूंचा गौरव करण्यासाठी एक समारंभ आयोजित केला होता. महाराज रणजित सिंग पुरस्कार मिळविणाऱ्या भारतीय हॉकीपटूंच्या यादीत हरमनप्रित सिंग, हार्दिक सिंग, मनदीप सिंग, जर्मनप्रित सिंग, समशेर सिंग, दिलप्रित सिंग, वरुणकुमार, कृष्णन पाठक, रुपिंदरपाल सिंग, गुर्जंत सिंग, आकाशदीप सिंग, सिमरनजीत सिंग, रमनदीप सिंग आणि गुरिंदर सिंग यांचा समावेश आहे. भारतीय हॉकी क्षेत्रामध्ये दर्जेदार कामगिरी केल्याबद्दल पंजाब शासनातर्फे हा पुरस्कार सदर हॉकीपटूंना देऊन गौरविण्यात आले.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या हस्ते चंदीगडमध्ये हॉकीपटूंनी पुरस्कार स्वीकारला. हरमनप्रित सिंगने भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व करताना विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भरीव कामगिरी केली आहे. गेल्या मार्चमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रित सिंगने भारताचा जागतिक दर्जाचा फलंदाज विराट कोहलीची भेट घेऊन क्रिकेटमधील त्याच्या अनुभवाची माहिती घेतली होती. हॉकी इंडियाच्या 2025 च्या आठव्या वार्षिक पुरस्काराचा आपल्याला अधिक आनंद झाल्याचे हरमनप्रित सिंगने म्हटले आहे. हरमनप्रित सिंगने आपल्या वैयक्तिक हॉकी कारकिर्दीत 250 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.