For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंजाबचा आज गुजरातशी मुकाबला

06:55 AM May 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंजाबचा आज गुजरातशी मुकाबला
Advertisement

वृत्तसंस्था

Advertisement

अहमदाबाद : आज रविवारी येथे इंडियन प्रीमियर लीगमध्ये सलग तिसरा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुजरात टायटन्सचा सामना करताना पंजाब किंग्स आपली आणखी घसरण होऊ नये यासाठी प्रयत्नशील असेल. या आठवड्याच्या सुऊवातीला राजस्थान रॉयल्सकडून किंग्सला या हंगामातील पहिल्या कटू पराभवाला सामोरे जावे लागले.

आठ सामन्यांतून 13 गुणांसह पंजाब किंग्स गुणतालिकेत अव्वल स्थानी असला, तरी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स त्यांच्यापेक्षा केवळ एका गुणाने मागे आहेत. सलग सहा विजय मिळवून सुऊवातीला आघाडी घेतलेल्या संघासाठी मागील सामन्यातील पराभवामुळे काही चिंता निर्माण झाल्या आहेत, विशेषत: गोलंदाजीशी त्या निगडीत आहेत.

Advertisement

पंजाबची गोलंदाजी त्यांच्या फलंदाजीच्या सातत्याशी जुळणारी नाही. किंबहुना, त्यांच्या दमदार फलंदाजीने अनेकदा गोलंदाजीतील उणीवा झाकल्या आहेत. विजयी सामन्यांमध्येही पंजाबच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघांना काही टप्प्यांवर मुक्तपणे धावा करण्याची संधी दिली आहे आणि नुकत्याच झालेल्या पराभवाने पुन्हा एकदा त्या समस्या उघड केल्या आहेत. त्यांचे क्षेत्ररक्षणही चिंतेचा विषय ठरले आहे, ज्यात अनेक झेल सोडले गेले आहेत.

दुसरीकडे, गुजरात टायटन्स सलग दोन सामने जिंकून या सामन्यात उतरत आहेत. त्यांची मोहीम बऱ्याच अंशी थांबून-थांबून सुरू राहिली आहे. त्यांना सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे, परंतु अलीकडील विजयांमुळे असे सूचित होते की, ते आता लयीत येत आहेत.  चेन्नई सुपर किंग्स आणि त्यानंतर आरसीबीवर सलग दोन विजय मिळवल्यामुळे टायटन्स संघ 10 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. गुजरातच्या फलंदाजीतील यशाचा मोठा वाटा त्यांच्या पहिल्या तीन फलंदाजांनी म्हणजे साई सुदर्शन, कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलर यांनी उचलला आहे. परंतु या त्रिकुटावरील अत्यधिक अवलंबन ही चिंतेची बाब आहे.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.