महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पंजाब : विषारी दारूने आठ जणांचा मृत्यू

07:00 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

12 जणांवर रुग्णालयात उपचार, चौघे अटकेत

Advertisement

वृत्तसंस्था /चंदीगड

Advertisement

पंजाबमधील संगरूरमध्ये बनावट दारूने कहर केला आहे. येथे विषारी दारू प्यायल्याने आठ जणांचा मृत्यू झाला, तर 12 जणांवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सध्या पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या जिल्ह्यामध्येच ही घटना घडल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागली आहे. विषारी मद्य प्रकरणी विशेष कायदा व सुव्यवस्था डीजीपी अर्पित शुक्ला आणि एडीजीपी हरचरण भुल्लर, एसएसपी सरताज चहल आणि जिल्हाधिकारी जतिंदर जोरवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आल्याचे सांगितले. तसेच कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई केल्याचेही स्पष्ट करण्यात आले. शोध मोहिमेदरम्यान संबंधितांकडून प्रिंटर, लॅपटॉप, 200 लिटर इथेनॉल, दारूच्या रिकाम्या बाटल्या, बाटलीची झाकण, दारूच्या बाटल्यांवर वापरलेले बनावट स्टिकर, बॉटल पॅप्सवर वापरलेले पंजाब सरकारचा बनावट शिक्का, बाटली बंद करण्याचे मशीन, अनेक बनावट दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article