कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लाच घेताना पंजाब पोलीस उपमहासंचालकांना अटक

07:00 AM Oct 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मोहाली : पंजाबमध्ये रोपड विभागाचे पोलीस उपमहासंचालक हरचरण सिंह भुल्लर यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. स्क्रॅप व्यावसायिकाशी निगडित प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. व्यावसायिकाकडून त्यांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यात आली होती, ज्यानंतर सीबीआयने सापळा रचत त्यांना पकडले आहे. एका प्रकरणात दिलासा देण्याच्या बदल्यात 5 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप भुल्लर यांच्यावर आहे. सीबीआयने ही कारवाई पूर्ण गोपनीयतेसह केली आहे. डीआयजी भुल्लर यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच टीमने त्यांना अटक केली आहे. भुल्लर यांच्याकडून नोटांचे बंडलही हस्तगत करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article