For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेशच्या तन्झिमवर दंडात्मक कारवाई

06:05 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेशच्या तन्झिमवर दंडात्मक कारवाई
Advertisement

वृत्तसंस्था/ किंग्सटाऊन

Advertisement

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तन्झिम हसनवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत नेपाळविरुद्धच्या सामन्यात तन्झिमकडून गैरवर्तन घडल्याने त्याच्यावर सामना मानधनाच्या 15 टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे.

रविवारी झालेल्या नेपाळ-बांगलादेश यांच्यातील सामन्यावेळी तन्झिमकडून आयसीसी आचारसंहितेच्या कलमाचे उल्लंघन झाले. नेपाळच्या डावातील तिसऱ्या षटकावेळी तन्झिम व नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल यांच्यात बाचाबाची झाली. तन्झिमने चेंडू टाकल्यानंतर रोहितकडे आक्रमक पद्धतीने चाल केली आणि त्याला धक्का दिला, या घटनेमुळे त्याच्यावर आयसीसीने ही कारवाई केली आहे. त्याचबरोबर त्याच्या नावावर एका डिमेरिट गुणाची नोंदही झाली आहे. 24 महिन्यातील त्याच्याकडून घडलेला हा पहिलाच अपराध असून त्याने आपला अपराध व शिक्षा मान्य केल्याने औपचारिक सुनावणी घेण्यात आली नसल्याचे  सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी निवेदनात म्हटले आहे. मैदानी पंच, तिसरे व चौथे पंच यांनी या घटनेबाबतचा अहवाल दिला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.