For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुणेरी पलटनची बेंगळूरवर मात

06:00 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
पुणेरी पलटनची बेंगळूरवर मात
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

2024 च्या प्रो कब•ाr लिग स्पर्धेतील येथे झालेल्या सामन्यात पुणे पलटनने बेंगळूर बुल्सचा 40-31 अशा 9 गुणांच्या फरकाने पराभव केला. या स्पर्धेत पुणे पलटनने यापूर्वीच या स्पर्धेच्या प्ले ऑफ गटात स्थान मिळवले आहे. बेंगळूर बुल्स विरुद्धच्या सामन्यात पुणेरी पलटनचा कर्णधार अस्लम इनामदारची कामगिरी दर्जेदार झाली. सामन्यातील पूर्वार्धात पुणेरी पलटनचा खेळ अधिक वेगवान आणि आक्रमक झाला. बेंगळूर संघातील सुशीलला आपल्या चढायावर गुण मिळवणे कठीण गेले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत पुणेरी पलटनने बेंगळूर बुल्सवर 18-13 अशी आघाडी मिळवली होती. कर्णधार अस्लम इनामदारला मोहित गोयातकडून चांगली साथ मिळाली. इनामदारच्या शानदार चढाईमुळे 14 व्या मिनिटाला बेंगळूर बुल्सचे सर्व गडी बाद झाले. शेवटच्या 15 मिनिटामध्ये पुणेरी पलटनने गुण वसूल अधिक प्रमाणात केले आणि अखेर बेंगळूर बुल्सला हा सामना गमवावा लागला.

Advertisement
Advertisement
Tags :

.