For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुणे विद्यापीठाची पहिल्या ट्रान्सजेंडर विद्यार्थिनीची आत्महत्या

11:13 AM Jan 21, 2025 IST | Pooja Marathe
पुणे विद्यापीठाची पहिल्या ट्रान्सजेंडर विद्यार्थिनीची आत्महत्या
Advertisement

पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पहिल्या ट्रान्सजेंडर विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सारंग पुणेकर असे या विद्यार्थिनीचे नाव होते. ३० वर्षाच्या सारंगने राजस्थान येथे १५ जानेवारी रोजी आत्महत्या केली. तिच्या पार्थिवावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ती राजस्थान येथील ट्रान्सजेंडर समुदायासह कार्यरत होती.
इंडियन एक्सप्रेस च्या रिपोर्टनुसार, सारंग पुणेकर ही आंबेडकरवादी आंदोलनाची समर्थक होती. तिने एनआरसी आणि सीएए याच्या विरुद्ध आवाज उठवला होता. सारंग पुणेकर च्या अंत्यसंस्काराला अनेकांनी उपस्थिती लावली होती.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाची सारंग पुणेकर ही पहिली ट्रान्सजेंडर विद्यार्थिनी होती. तिच्या सोबत काम करण्याच अनुभव अद्वितीय होता, अशी प्रतिक्रीया डॉ. अनघा तांबे यांनी दिली. त्या एसपीपीयु च्या वुमेन स्टडीज डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत.
शिवसेना (उबाठा) गटाच्या सुष्मा अंधारे यांनीही प्रतिक्रीया दिली. त्या म्हणाल्या, सारंग पुणेकर हीने पुण्यामध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान बनवले होते. ती लैंगिक अधिकारासारख्या अनेक मुद्यांसाठी आग्रही राहली. तिने एक विद्यार्थिनी म्हणून जेंडर स्टडीजला वेगळा दृष्टीकोन दिला. यासोबत तिच्या समाजाच्या विविध प्रश्नांसाठी कार्यरत होती. आम्ही तिच्या स्वप्नांचे समर्थन करू शकलो नाही याचे दुःख आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.