‘आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा, नाहीतर बघा’; पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत सापडलेल्या चिठ्ठीची चर्चा
10:46 AM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पुणे: पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीदरम्यान मतपेटीत आढळलेल्या एका चिठ्ठीची सध्या चर्चा सुरू आहे. ‘आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही. जुनी पेन्शन योजना लागू करा, नाहीतर बघा,’ अशा आशयाचा संदेश या चिठ्ठीत लिहिल्याची माहिती समोर आली आहे. पुरंदर तालुक्यातील राजेवाडी मतदान केंद्रावर ही चिठ्ठी मतपेटीत टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुनी पेन्शन योजना हा शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. या चिठ्ठीच्या माध्यमातून संबंधित शिक्षक मतदाराने आपल्या मागणीबाबत नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येते.
Advertisement
मतदान प्रक्रियेदरम्यान मतपेटीत अशा प्रकारचा संदेश आढळल्याने शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी विविध कर्मचारी संघटनांकडून सातत्याने केली जात आहे.
दरम्यान, या चिठ्ठीबाबत निवडणूक प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. चिठ्ठीमागील नेमकी पार्श्वभूमी स्पष्ट नसली, तरी शिक्षकांमधील जुन्या पेन्शन योजनेविषयीची भावना या घटनेतून व्यक्त होत असल्याची चर्चा आहे.
Advertisement
Advertisement
