For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Woman Exploit by Godman "मी देव आहे म्हणत १५ वर्षांपासून दिले विजेचे झटके, लैंगिक अन् मानसिक शोषण" पुण्यात भोंदू बाबासह ७ साथीदारांना अटक

05:44 PM Jun 18, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
woman exploit by godman  मी देव आहे म्हणत १५ वर्षांपासून दिले विजेचे झटके  लैंगिक अन् मानसिक शोषण  पुण्यात भोंदू बाबासह ७ साथीदारांना अटक
Ai Genareted
Advertisement

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातून बुवाबाजीची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यात प्रामुख्याने नाशिकच्या अशोक खरातचा उल्लेख करायलाच हवा. त्यानंतर सांगलीतील विट्यातही बुवाबाजी करणाऱ्या दोघांनी अल्ववयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर आता विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातून महाराष्ट्र हादरवणारी घटना समोर आली आहे. 

Advertisement

बाबासह ७ साथीदारांना अटक

मिळालेल्या  माहितीनुसार पोलिसांनी गुरुवारी सांगितले केले की, त्यांनी एका स्वयंघोषित बाबाला आणि त्याच्या सात साथीदारांना अटक केली आहे. दैवी शक्ती असल्याचा दावा करत, अनेक वर्षांपासून एका महिलेचा लैंगिक छळ, शारीरिक अत्याचार आणि आर्थिक शोषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, अटक केलेल्या सात जणांपैकी सहा महिला आहेत.

Advertisement

विजेचे झटके आणि मुत्र प्यायला लावले

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडित महिलेचा बराच काळ छळ करण्यात आला. यादरम्यान तिला विजेचे धक्के देण्यात आले आणि पुरुषाचे मूत्र पिण्यास भाग पाडले गेले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, १६ जून रोजी तक्रार मिळाल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला आणि स्वतःला बाबा म्हणवणाऱ्या राधामोहन मिश्रासह आठ आरोपींना अटक करण्यात आली.

आरोपींनी तक्रारदार महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार, विनयभंग केला आणि तिला अमानुषपणे वागवले. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (बीएनएस) संबंधित कलमांनुसार आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, दुष्ट आणि अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंध व निर्मूलन कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खराडी भागात आश्रमाची झडती घेतली होती

एका महिलेच्या तक्रारीनंतर पुण्यातील खराडी भागातील मिश्रा यांच्या आश्रमाची झडती घेण्यात आली. यावेळी पोलिसांनी आठ लॅपटॉप, १९ हार्ड डिस्क, १० डीव्हीडी, नऊ मोबाईल फोन, २० कॅसेट आणि २३ पेन ड्राइव्ह जप्त केले. अधिकाऱ्याने सांगितले की, सुमारे ६.५ लाख रुपये रोख आणि १५ लाखांपेक्षा जास्त किमतीचे सोन्या-चांदीचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच आश्रमात मोठ्या प्रमाणात औषधे सापडली असून, त्यापैकी काही कालबाह्य झाली होती. या औषधांचा वापर आणि उद्देश याचीही चौकशी सुरू आहे.

Advertisement
Tags :

.