For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; 15.50 लाखांचा मुद्देमाल जप्त, १२ गुन्हे उघडकीस!

02:22 PM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई  15 50 लाखांचा मुद्देमाल जप्त  १२ गुन्हे उघडकीस
Advertisement
इंदापूर : दरोडा, घरफोडी आणि जबरी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी 15 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील 12 गुन्ह्यांची उकल केली आहे.

पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना पुणे-सोलापूर बायपासवरील जगदंब हॉटेल परिसरात संशयित येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांपैकी दोघांना शिताफीने ताब्यात घेतले.

Advertisement

सोन्याचे दागिने, दुचाकी आणि मोबाईल जप्त

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून 10 तोळे सोन्याचे दागिने, 2 मोटारसायकली आणि मोबाईल असा एकूण 15 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या कारवाईत इंदापूर, दौंड, भिगवण आणि वालचंदनगर परिसरातील तसेच सोलापूर ग्रामीणमधील पंढरपूर व करकंब येथील घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लागला आहे.

Advertisement

पोलिसांच्या कारवाईचे कौतुक

एकाच कारवाईत 12 गुन्ह्यांची उकल झाल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. संबंधित गुन्ह्यांचा पुढील तपास स्थानिक पोलीस ठाण्यांमार्फत सुरू आहे.

Advertisement

.