For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ketan Agrawal Case | केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट! सिया गोयलची पॉलीग्राफ टेस्ट होणार?

04:10 PM Jul 01, 2026 IST | NEETA POTDAR
ketan agrawal case    केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट  सिया गोयलची पॉलीग्राफ टेस्ट होणार
Advertisement

पुणे - पुण्यातील केतन अग्रवालची प्रकरणाला वेग आला आहे.. अटक करण्यात आलेल्या सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कसून चौकशी करत असून, भक्कम पुरावे गोळा करण्यावर भर दिला जात आहे. तपासात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अत्यंत सावधपणे प्रत्येक पुराव्याची पडताळणी करत आहेत.

Advertisement

या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा घटनास्थळावरील ठोस दृश्य पुरावे उपलब्ध नसल्याने तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे डिजिटल पुरावे, तांत्रिक माहिती आणि इतर परिस्थितीजन्य बाबींच्या आधारे संपूर्ण तपास पुढे नेला जात आहे.

दरम्यान, तपासाचा भाग म्हणून सिया गोयलची पॉलीग्राफ चाचणी घेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या चाचणीतून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे तपासाला नवी दिशा मिळू शकते, अशी पोलिसांची अपेक्षा आहे. त्याचबरोबर मोबाईल डेटा, लोकेशन हिस्ट्री आणि इतर डिजिटल पुरावेही तपासले जात आहेत.

Advertisement

सध्या या प्रकरणातील तपास मुख्यतः परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित असून, प्रत्येक पुरावा कायदेशीरदृष्ट्या भक्कम राहील यासाठी पोलीस अत्यंत बारकाईने काम करत आहेत.

सोनम रघुवंशी प्रकरणाचे धडे

सोनम रघुवंशी प्रकरणात पोलिसांनी अटकेचे कारण योग्यरित्या नमूद न केल्याने आणि कायद्याच्या कलमांमध्ये चूक केल्याने आरोपीला जामीन मिळाला. “न्यायालय पुराव्यांवर चालते, मीडिया ट्रायलवर नाही. एक छोटी चूकही संपूर्ण केस कमकुवत करू शकते,” असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement
Tags :

.