For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पुणे पोलीस दलात खळबळ ! अपेक्षित ठिकाणी बदली न मिळाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात मोठा राडा, थेट आत घुसवली कार

10:49 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
पुणे पोलीस दलात खळबळ   अपेक्षित ठिकाणी बदली न मिळाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप  पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात मोठा राडा  थेट आत घुसवली कार
Advertisement

पुणे : अपेक्षित ठिकाणी बदली न झाल्याने संतप्त झालेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने थेट पोलीस आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर कार धडकवून आत घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली असून संबंधित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

अमोल भिसे असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून ते पुणे पोलीस मुख्यालयात कार्यरत असल्याची माहिती आहे. पुणे पोलीस दलात नुकत्याच अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. या प्रक्रियेत भिसे यांना शहरातील एका विशिष्ट पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, जाहीर झालेल्या बदली आदेशात त्यांच्या अपेक्षेप्रमाणे निर्णय न झाल्याने ते नाराज होते.

या नाराजीतून भिसे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानाकडे कारने धाव घेतली. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला कारची धडक दिल्याचा आणि आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. घटनेच्या वेळी ते मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून संबंधित कॉन्स्टेबलला ताब्यात घेतले. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

स्वतःच्या पोलीस दलातील कर्मचाऱ्याकडूनच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी अशा प्रकारे प्रवेश करण्याचा प्रयत्न झाल्याने पुणे पोलीस वर्तुळात या घटनेची चर्चा सुरू आहे. या प्रकरणातून पोलीस दलातील अंतर्गत बदली प्रक्रियेबाबत कर्मचाऱ्यांची नाराजी आणि शिस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Advertisement
Tags :

.