For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रनिंग करताना भरधाव कारची धडक; पुण्यात आयटी अभियंत्याचा मृत्यू

06:22 PM Sep 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
रनिंग करताना भरधाव कारची धडक  पुण्यात आयटी अभियंत्याचा मृत्यू
Advertisement

पुणे : प्रतिनिधी : पुण्यातील पाषाण-बावधन रस्त्यावरील नेकलेस गार्डन परिसरात सकाळी धावण्याचा सराव करणाऱ्या एका आयटी अभियंत्याचा भरधाव कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. विरेंद्र द्विवेदी (42) असे मृत्यू झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. ही घटना समोर आल्यानंतर पुणे शहरासह आयटी क्षेत्रात खळबळ उडाली असून, नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, विरेंद्र द्विवेदी हे सकाळी पाषाण-बावधन रस्त्यावरील नेकलेस गार्डन परिसरात धावण्याचा सराव करत होते. त्याचवेळी 19 वर्षीय तरुणाने चालविलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिल्याची माहिती आहे. धडकेत द्विवेदी गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या कारने त्यांना धडक दिली, त्याच कारमधून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Advertisement

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भरधाव वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :

.