यजमान संघासह पुणे, कोल्हापूर उपांत्यपूर्व फेरीत
इस्लामपूर :
येथील विद्यामंदिर हायस्कुल मैदानवर सुऊ असलेल्या राज्यस्तरीय खा.एस.डी पाटील सुवर्ण चषक स्पर्धेत यजमान पाटील संघासह पुणे, कोल्हापूर, मुंबई संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. शनिवारी उपांत्य फेरीसाठी थरार रंगणार आहे.
सकाळच्या सामन्यात पुणेच्या रेल्वे लाईन बॉईज संघाने कोल्हापूरच्या शाहू फाउंडेशन संघाचा 2-1 गोल फरकांनी पराभव केला. पूर्वार्धात शाहू संघाच्या आदित्य कुंभारने 16 व्या मिनिटात मिळालेल्या पेनल्टी कॉर्नवर गोल नोंदवला. उत्तरार्धात 53 व 54 व्या मिनिटात रेल्वे लाईन बॉईजच्या दीपक सिंगने 2 गोल नोंदवत संघास विजय मिळवून दिला.
दुसरा सामना एसडी पाटील ट्रस्ट ब्ल्यू विरुद्ध खालसा युथ क्लब नांदेड यांच्यात अत्यंत चुरशीने झाला. हा समाना 2-2 गोल बरोबरीत सुटला. एसडी पाटील ब्लू संघाकडून सिद्धार्थ जाधव व वैभव खांबे यांनी दोन गोल तर नांदेड संघाकडून बालाजी मेटकर व रामा घोडेगाव यांनी गोल केले. तिसरा सामना महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोल्हापूर विरुद्ध मुंबई फोर्ट अथोरिटी मुंबई यांच्यात होऊन हा सामना महाराष्ट्र क्रीडा मंडळाने 4-2 गोलने जिंकला. महाराष्ट्र संघाकडून समीर भोसले व संकेत पाटील यांनी प्रत्येकी 2 गोल केले. मुंबई कोर्ट संघाकडून नवीन करकट्टी व स्टीफन स्वामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
या सामन्याच्या उत्तरार्धात 55 व्या मिनिटाला यजमान संघाच्या सचिन भोसले याने अप्रतिम गोल करत संघास विजय मिळवून दिला. पाचव्या सामन्यात मुंबई पोलीस मुंबई संघाने शाहू फाउंडेशन कोल्हापूरचा 3-0 गोलफरकांनी पराभव केला. मुंबई पोलीस संघाकडून रोहन पवारने 2 तर सुनील शिपोरेने गोल केला. आजच्या शेवटच्या सामन्यात कोल्हापूर पोलीस संघाने खालसा युथ क्लब नांदेडवर 2-0 गोलफरकांनी मात केली.