For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पुणे मेट्रोमुळे शहराच्या विकासाला नवी गती: पंतप्रधान मोदी; हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेचे ऑनलाइन लोकार्पण

02:57 PM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
पुणे मेट्रोमुळे शहराच्या विकासाला नवी गती  पंतप्रधान मोदी  हिंजवडी शिवाजीनगर मार्गिकेचे ऑनलाइन लोकार्पण
Advertisement
पुणे : पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाइन माध्यमातून कार्यक्रमात सहभाग घेत मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी पुण्याच्या विकासासह देशातील मेट्रो विस्तार आणि आधुनिक पायाभूत सुविधांबाबत सरकारची भूमिका मांडली.
दिवाळीच्या शुभेच्छा देत पंतप्रधानांनी पुणेकरांसाठी नव्या मेट्रो सुविधेचे महत्त्व अधोरेखित केले. मेट्रोमुळे शहरातील जुन्या आणि नव्या भागांमधील संपर्क वाढणार असून आयटी क्षेत्राला त्याचा मोठा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. पुणे शहराने देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले असून मेट्रोच्या विस्तारामुळे शहराच्या प्रगतीला आणखी वेग मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर

पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेमुळे नागरिकांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. आधुनिक वाहतूक सुविधा शहराच्या विकासाला चालना देतात आणि नागरिकांचा वेळ वाचवतात. पुणे मेट्रोचा विस्तार हा शहराच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

Advertisement

पुणे हे कल्पकता, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र आहे. मेट्रोचे जाळे विस्तारल्याने शहरातील विविध भागांमधील दळणवळण सुधारेल आणि आयटी हबच्या विकासाला मदत मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

देशातील मेट्रो नेटवर्कमध्ये मोठी वाढ

देशातील मेट्रो सेवेच्या विकासाचा आढावा घेताना पंतप्रधान मोदी यांनी २०१४ पूर्वी आणि त्यानंतरच्या विस्तारातील फरक स्पष्ट केला. १९८४ मध्ये देशात पहिली मेट्रो सुरू झाली. त्यानंतर तीन दशकांत मेट्रोचा विस्तार मर्यादित राहिला होता. २०१४ पर्यंत देशातील केवळ पाच शहरांमध्ये मेट्रो सेवा उपलब्ध होती.

Advertisement

मात्र, २०१४ नंतर मेट्रो विस्ताराला गती मिळाल्याचे सांगत पंतप्रधानांनी देशातील मेट्रो मार्गांचे जाळे सुमारे १२०० किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचा उल्लेख केला. सध्या देशातील २६ शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे मेट्रो विकासाचे आदर्श मॉडेल

विकसित भारताच्या संकल्पनेत आधुनिक वाहतूक आणि पायाभूत सुविधांना महत्त्वाचे स्थान असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. पुणे मेट्रो हा विकासाचा उत्तम नमुना असून शहराच्या प्रगतीसह देशाच्या आर्थिक विकासाला दिशा देणारा प्रकल्प ठरेल, असे त्यांनी म्हटले.

‘वी विल डू इट’ अर्थात ‘आपण हे करून दाखवू’ हा आत्मविश्वास प्रत्येकाच्या मनात असणे आवश्यक आहे. सामूहिक प्रयत्नांतून विकासाची उद्दिष्टे साध्य करता येतील, असा संदेशही पंतप्रधानांनी यावेळी दिला.

Advertisement
Tags :

.