For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pune Parvati Crime News | आई-वडील कामाला गेले अन् 'तो' काळ बनून घरात शिरला! खाऊच्या पैशांचं प्रलोभन आणि ७० वर्षांच्या नराधमाचं पाप

05:13 PM May 06, 2026 IST | NEETA POTDAR
pune parvati crime news   आई वडील कामाला गेले अन्  तो  काळ बनून घरात शिरला  खाऊच्या पैशांचं प्रलोभन आणि ७० वर्षांच्या नराधमाचं पाप
Advertisement

                              ९ वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न

Advertisement

पुणे - नसरापूर घटनेने महाराष्ट्र हादरला असतानाच पुन्हा पुण्यात माणुसकीला काळिमा फसणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. पुण्यातील पर्वती पायथा या ठिकाणी ९ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे. बा प्रयत्न दुसरे तिसऱ्यांनी केला नसुन त्या चिमुरडीच्या आजोबांनी केले आहे. पर्वती येथील एका 70 वर्षांच्या वृद्धाने आपल्या स्वत:च्या नातीवरच अत्याचाराचा प्रयत्न केला. या मुलीचे आई-वडील हे कामाला जातात. ते घरी नसताना या वृ्द्धाने घरातच नातीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर असताना ७० वर्षीय आरोपी आजोबाने घरातच तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नातू-नात दोघेही आजोबांना भेटण्यासाठी आले होते. आरोपीने नातीला पैसे देऊन खाऊ आणण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिचे कपडे काढून स्वतःचेही कपडे काढत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

हा प्रकार पत्र्याच्या घरात घडत असताना एका महिलेच्या लक्षात आला. तिने तत्काळ इतरांना माहिती दिल्याने नागरिकांनी हस्तक्षेप करत मुलीची सुटका केली आणि आरोपीला पकडून ठेवले.

घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीची प्रकृती सध्या चांगली असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पोलिसांनी समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :

.