For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ; आठ मतपेट्यांना सील नसल्याचा आक्षेप

09:51 AM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ  आठ मतपेट्यांना सील नसल्याचा आक्षेप
Advertisement

पुणे: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान पुणे पदवीधर मतदारसंघात काही काळ गोंधळ निर्माण झाला. सात ते आठ मतपेट्यांवरील लाखेचे सील तुटलेले असल्याचा दावा करत महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांच्यासह विविध उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आक्षेप नोंदवला. या प्रकारामुळे मतमोजणी प्रक्रियेत काही काळ व्यत्यय आल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

नेमका वाद कशावरून?

प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणी केंद्रावर काही मतपेट्यांवरील सील तुटलेल्या अवस्थेत आढळल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मतपेट्यांवरील कागदी सील कायम असले, तरी लाखेचे सील तुटलेले असल्याचा त्यांचा आक्षेप होता.

या प्रकरणाची पाहणी करण्यासाठी अधिकारी घटनास्थळी आले. मात्र, कागदी सील असल्याच्या कारणावरून मतमोजणी सुरू ठेवण्यास सांगितल्याचा दावा प्रतिनिधींनी केला. यावरून अधिकारी आणि प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Advertisement

सील तुटलेल्या मतपेट्या बाजूला ठेवण्याची मागणी

सील तुटलेल्या मतपेट्यांमधील मतमोजणीबाबत पारदर्शकता राखण्याची मागणी प्रतिनिधींनी केली. संबंधित मतपेट्या स्वतंत्र ठेवून उर्वरित मतपेट्यांची मतमोजणी सुरू ठेवावी, अशी त्यांची भूमिका होती. तसेच, या प्रकरणाची व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले; मात्र त्याची प्रत कधी मिळणार, याबाबतही प्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केले.

लेखी तक्रार नोंदवण्यास अडचणी आल्याचा आरोपही काही प्रतिनिधींनी केला. सर्व संबंधित उमेदवारांच्या प्रतिनिधींना आपली बाजू मांडण्याची संधी देऊन तक्रारीची नोंद घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष

मतपेट्यांवरील सील तुटल्याचा दावा आणि त्यासंदर्भातील आक्षेपांमुळे मतमोजणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात निवडणूक प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Tags :

.