For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘परवानगीची मिजास उतरवू’; डीजेच्या आवाजावरून विद्यानंद बापट आक्रमक

11:40 AM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘परवानगीची मिजास उतरवू’  डीजेच्या आवाजावरून विद्यानंद बापट आक्रमक
Advertisement

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा ढोल-ताशांसह डीजेच्या दणदणाटाची चर्चा रंगली. डीजे आणि लाऊडस्पीकरच्या आवाजाला विरोध करणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्याविरोधात काही गणेश मंडळांकडून बॅनर, एलईडी स्क्रीनवरील संदेश आणि विविध देखावे सादर करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत बापट यांच्या भूमिकेवरूनही चर्चा झाली.

Advertisement

डीजेविरोधातील आपल्या भूमिकेमुळे काही मंडळांनी आपली खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला, याबाबत प्रतिक्रिया देताना बापट यांनी हा विषय वैयक्तिक नसल्याचे स्पष्ट केले. नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने होणारे ध्वनिप्रदूषण आणि वाहतुकीतील अडथळे याला आपला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.

‘परवानगीच्या नावाखाली नियमांचे उल्लंघन नको’

Advertisement

बापट यांच्या म्हणण्यानुसार, काही मंडळे डीजेला परवानगी मिळाल्याचा आधार घेत मोठ्या आवाजात ध्वनिप्रदूषण करतात. मात्र परवानगी असली तरी त्याचा नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने वापर होऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे.

विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या आवाजाबाबत बोलताना त्यांनी आपला विरोध कायम राहणार असल्याचे सांगितले. ध्वनिप्रदूषणामुळे आजूबाजूच्या नागरिकांना होणारा त्रास आणि मिरवणुकीदरम्यान निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्यांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, बापट यांच्या प्रतिक्रियेत काही मंडळे आणि उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीवरून तीव्र शब्दांचा वापर करण्यात आला. त्यांच्या या वक्तव्यामुळे डीजे, ध्वनिप्रदूषण आणि गणेशोत्सवातील मिरवणुकीच्या स्वरूपावर सुरू असलेल्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

Advertisement
Tags :

.