For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पुण्यात धक्कादायक घटना; गर्भवती महिलेच्या पोटावर लाथ, गर्भपात..!

05:41 PM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
पुण्यात धक्कादायक घटना  गर्भवती महिलेच्या पोटावर लाथ  गर्भपात
Advertisement

पुणे : दुचाकीचे चाक पायावरून गेल्याच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणाला मारहाण करण्यात आली. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या त्याच्या गर्भवती पत्नीवरही हल्ला करण्यात आल्याने तिचा गर्भपात झाल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली.

Advertisement

या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात सज्जाद बबलू मेमन आणि त्याची बहीण सना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार घराजवळ उभे असताना सज्जाद दुचाकीवरून तेथून जात होता. त्यावेळी दुचाकीचे चाक तक्रारदाराच्या पायावरून गेले. याबाबत जाब विचारल्याने दोघांमध्ये वाद झाला आणि सज्जादने तक्रारदाराला मारहाण केल्याचा आरोप आहे.

Advertisement

भांडण सुरू असल्याचे पाहून तक्रारदाराची गर्भवती पत्नी मदतीसाठी पुढे आली. त्यावेळी सना हिने तिचे केस पकडून मारहाण केली, तर सज्जादने तिच्या पोटावर लाथ मारल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर महिलेला पोटदुखी आणि रक्तस्राव सुरू झाला.

घटना समजल्यानंतर तिला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर तिचा गर्भपात झाल्याचे समोर आले.

या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दुखापत तसेच महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात केल्यासंबंधीच्या कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. उपनिरीक्षक तानाजी शेगर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.