कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Pune Bangalore Highway वर भीषण अपघात, आराम बसची कंटेनरला धडक, तरुण जागीच ठार

12:48 PM May 25, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

आराम बसच्या लोखंडी चॅनलमध्ये त्याचा मृतदेह अडकून बसला होता

Advertisement

कोल्हापूर : पुणे-बेंगळूर महामार्गावर शिरोली औद्योगिक वसाहतीनजीक शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. प्रवासी आरामबसची थांबलेल्या कंटेनरला मागून धडक बसली. यामध्ये बसचा क्लिनर जागीच ठार झाला तर 17 प्रवासी जखमी झाले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

Advertisement

रोहन कुलकर्णी (वय 30, रा. खडकलाट, निपाणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर प्रवीण कॅबाबी (पुणे), संजय तेजम व महेश पाटील (दोघेही चंदगड), किरण पाटील, राजन गुरव, गौरंग जाधव, प्रदीप जाधव, अमोल देसाई, उत्कर्ष बसणे, जयवंत शिंगटे, देवराज मोरे, नारायण वाटवेकर, ऐश्वर्या गुन्तकल, सोनाली मोरे, साहिल देसाई, स्नेहल डोंगळे व रितू हवळ अशी जखमींची नावे आहेत.

मृत रोहन कुलकर्णी हा नाकोडा आरामबसमध्ये क्लिनर म्हणून काम करत होता. याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, नाकोडा कंपनीची आरामबस पुण्याहून बेळगावला निघाली होती. महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. तसेच सकाळी पाऊस सुरू होता. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती.

आराम बस वेगात असल्याने बसचालकाने समोरील ट्रकला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. शिरोली औद्योगिक वसाहतीमधील मेनन पिस्टन कंपनीसमोर महामार्गाच्या डाव्या बाजूस एक कंटेनर उभा होता. यावेळी आरामबस चालकाला अंदाज न आल्याने बसची कंटेनरला धडक बसली. यामध्ये आरामबसच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला.

चालक संदीप शंकरराव चांगभले महामार्ग पोलिसांची तत्काळ मदत अपघाताची माहिती मिळताच महामार्गच्या उजळाईवाडी केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलीस अंमलदार मोहन गवळी, जुबीन शेख, विनायक डोंगरे, अनिल गावडे हे अवघ्या १० मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले. अपघातामधील जखमींना 108 अॅम्ब्युलन्समधून तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

क्रेनच्या सहाय्याने आरामबस आणि कंटेनर बाजूला करण्यात आला. यानंतर अर्ध्या तासामध्ये महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. यांनी बसमधून उडी घेऊन स्वतःला बाचविले. क्लिनर रोहन कुलकर्णी हा कंटेनरला धडकणाऱ्या बाजूकडे बसला असल्यामुळे तो जागीच ठार झाला. आराम बसच्या लोखंडी चॅनलमध्ये त्याचा मृतदेह अडकून बसला होता.

बसपाठोपाठ असणाऱ्या मोटार चालकाने आपली मोटार नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र या मोटारीनेही अपघातग्रस्त बसला धडक दिली. अपघाताचा आवाज मोठा झाल्याने महामार्गालगत असणाऱ्या कंपन्यांमधील कामगारांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ बसमधील जखमींना बाहेर काढत मदतकार्य सुरू केले.

अपघातस्थळापासून जवळच असलेल्या शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीसही तत्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमींची संख्या पाहता परिसरातील अनेक रुग्णवाहिकांना भ्रमण ध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. सुमारे सहा रुग्णवाहिकांमधून प्रवाशांना कोल्हापूर येथे उपचारासाठी नेण्यात आले. किरकोळ जखमींवर पुलाची शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.

Advertisement
Tags :
@accident@KOLHAPUR_NEWS#kolhapur News#pune-bangalore highway#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediacrime newskolhapur crime newsMIDC
Next Article