For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई, न्यायिक चौकशी व्हावी; पुणे अपघात प्रकरणी काँग्रेस नेत्यांची मागणी

10:38 AM May 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई  न्यायिक चौकशी व्हावी  पुणे अपघात प्रकरणी काँग्रेस नेत्यांची मागणी
Advertisement

मुंबई प्रतिनिधी

बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल याने भरधाव कारने दोघांना चिरडले. तरीही त्या मुलाची मुलाला पोलिसांनी बडदास्त राखली. गुन्हा दाखल करताना किरकोळ कलमे लावून तातडीने रात्रीच कोर्टात हजर कऊन जामीन मिळाला. ह्या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसत असून अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. तर या प्रकरणाची न्यायिक चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Advertisement

दरम्यान लोंढे म्हणाले की, पुणे अपघातातील आरोपी हा बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांतच्या भरधाव कारने दोघांना चिरडले. वेदांत हा दाऊच्या नशेत कार चालवत होता तसेच त्याची पोर्शे ह्या कारला नंबरप्लेटही नव्हती. बेदरकारपणे कार चालवून दोघांना चिरडलेल्या वेदांत अग्रवालला पोलीसांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यासाठी पिझ्झा, बर्गर मागवल्याचेही समजते. एवढे गंभीर प्रकरण असताना पोलीसांनी तातडीने थातूर मातूर कलमे लावून लगेच कोर्टात हजर केले, पोलिसांनी वेदांतला वाचवण्यासासाठी एवढी तत्परता का दाखवली? पोलिसांवर कोणाचा राजकीय दबाव होता का? याची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. आता मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी कारवाईची संकेत दिले असले तरी ’बैल गेला आणि झोपा केला‘ असा प्रकार असून पुणे शहराचा सांस्कृतिक व शैक्षणिक नगरी असा लौकिक आहे पण त्याला काळमा फासण्याचे काम या महायुती सरकारने केले आहे, असा आरोपही अतुल लोंढे यांनी केला आहे.

न्यायिक चौकशी व्हावी :
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारू पित असल्याचे सीसीटिव्ही फुटेज असूनही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली? रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली?नियम डावलून बार आणि पब सुरू होते का? तसेच वडेट्टीवार यांनी आरोपी अल्पवयीन आहे हे माहीत असताना त्याच्या वडिलांना अटक करण्यात इतका वेळ का लागला? असा प्रश्न उपस्थित करत सदर घटनेची न्यायिक चौकशी व्हावी आणि या प्रकरणात पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

Advertisement

पुणे पोलिस आयुक्तांना बडतफ करा : संजय राऊत
शनिवारी पुण्यात मद्यधुंद अवस्थेत एका किशोरवयीन मुलाने दोघांचे प्राण घेतले. यावर बोलताना राऊत यांनी पुणे पोलिसांना आयुक्तांना बडतर्फ करण्याची मागणी केली. तसेच अजित पवार गटाचे आमदार माणुसकी शून्य असून दोन तऊणांचे मुडदे पाडलेल्यांना पिझ्झा बर्गर खाऊ घातला जात असल्याचे राऊत म्हणाले.

ठाकरेंनी केले पंजाला मतदान
ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या पंजाला या लोकसभेत मतदान केले. राजकीय इतिहासात शिवसेनेच्या नेत्याने काँग्रेसला मतदान केल्याने विरोधकांकडून टिका आहे. यावर बोलताना राऊत यांनी स्पष्ट करत सांगितले की, महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन देश आणि संविधान वाचविण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. निशाणी कोणती हा प्रश्न नसून लढाई देश आणि संविधान वाचविण्याची आहे. उद्धव ठाकरे जसे पंजाला मतदान करत आहेत तसेच अनेक काँग्रेस नेते मशाल आणि तुतारीला मतदान करत असल्याचे राऊत म्हणाले.

Advertisement
Tags :

.