kolhapur : काळम्मावाडी योजनेच्या पंप दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात ; लवकरच पाणीपुरवठा सुरळीत
गुरुवारपासून होणार सुरळीत पाणीपुरवठा
कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या चौथ्या पंप दुरुस्तीचे काम सोमवारी हाती घेण्यात आले आहे. तसेच साळोखेनगर ११०० मी.मी. मुख्य वितरण नलिकेवरील व्हॉल्व्ह बसविण्याचे कामही सुरू केले आहे. सोमवारी दिवसभर हे काम सुरू होते. आज रात्री उशिरापर्यंत सदरचे काम पूर्ण होणार असुन उद्या कमी दाबाने व गुरुवारपासून सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचे शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितले.
दरम्यान, सदरचे काम सुरू असताना पुईखडी पंपींग स्टेशन येथील गाळ काढण्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. नागरिकांनी रविवारीच मुबलक पाणीसाठा करून ठेवला असल्याने सोमवारी पाण्याची टंचाई जाणवली नाही. शहरातील काही भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. टिंबर मार्केट येथील परिसरात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.
आज दिवसभरात कामाला गती दिली जाणार आहे. रात्रीपर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर तत्काळ पाणी उपसा सुरू होणार आहे. आज रात्री काही भागात पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. उद्या अपुरा व कमी दाबाने होईल. त्याचप्रमाणे बालिंगा योजनेवर अवलंबून असणायया सी, डी वॉर्ड व शिंगणापूर येथून कसबा बावडा फिल्टरकडून कसबा बावडा, ताराबाई पार्क व कावळा नाका परिसरातील नागरीकांचा पाणी पुरवठा सुरू ठेवण्यात आला होते.