‘ग्लोरी’ चित्रपटात पुलकित, दिव्येंदु
सयानी गुप्ताही महत्त्वाच्या भूमिकेत
पुलकित सम्राट आणि दिव्येंदु शर्मा यांची मुख्य भूमिका असलेली सीरिज ‘ग्लोरी’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ही सीरिज महत्त्वाकांक्षा आणि सूडाच्या अवतीभवती गुंफलेली कहाणी दर्शविणारी असून याच्या केंद्रस्थानी रहस्याने भरलेल्या हत्येची कहाणी आहे.

या ट्रेलरची सुरुवात हरियाणाच्या बॉक्सिंग क्लबने होते, ज्याला चॅम्पियन्स निर्माण करण्याची फॅक्ट्री म्हटले जात असते. ऑलिम्पिकमध्ये विजयाची इच्छा बाळगणारे रघुवीर सिंह (सुविंदर विक्की) हा मुष्टियुद्ध प्रशिक्षक असतो, जो स्वत:चा वारसा कायम ठेवण्यासाठी अत्यंत मेहनत करतो. स्वत:ची बहिण गुडिया (जन्नत जुबैर)वर झालेला हिंसक हल्ला आणणा ऑलिम्पिक मुक्केबाज निहाल सिंहच्या रहस्यमय हत्येचे सत्य जाणून घेण्यासाठी त्याचे पुत्र देव (दिव्येंदु) आणि रवि (पुलकित) शक्तिगढ येत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे.
आशुतोष राणा, सिकंदर खेर, सयानी गुप्ता देखील यात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. यशपाल शर्मा, कश्मीरा परदेशी आणि कुणाल ठाकूर देखील यात दिसून येणार आहे. या ट्रेलरमधील अभिनय पाहून दिव्येंदु शर्माचे कौतुक केले जात आहे. तर पुलकितसोबतची त्याची केमिस्ट्रीही आकर्षक ठरली आहे.