मतदार उजळणी यादी प्रसिद्धी पुन्हा लांबणीवर
12:29 PM Feb 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : भारतीय निवडणूक आयोगाने मतदार उजळणी मोहिमेंतर्गत (एसआयआर) मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या तारखेत पुन्हा वाढ केली असून, आता ही मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख 21 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय निवडणूक आयोगातर्फे 1 जानेवारी 2026 ही पात्र तारीख धरून विशेष मतदार यादी उजळणी मोहिमेंतर्गत मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. परंतु त्यानंतर यामध्ये कालावधी वाढवून तो 14 फेब्रुवारी असा करण्यात आला होता. आता पुन्हा यादी प्रसिद्ध करण्याची मुदत 21 फेबुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.
Advertisement
Advertisement