महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘तरुण भारत’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

06:22 AM Nov 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

सूर्यकिरण हॉटेल पणजी येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात काल शुक्रवारी दैनिक तरुण भारत गोवाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन दैनिक तरुण भारतचे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे संस्थापक चेअरमन किरण ठाकुर यांच्याहस्ते करण्यात आले.

Advertisement

यावेळी दिवाळी अंकाच्या मुख्यपृष्ठावरील छायाचित्र असलेल्या अभिनेत्री तथा अष्टपैलू कलाकार ऱ्हीया पाटील या उपस्थित होत्या. तसेच तरुण भारत, गोवा संपादक सागर जावडेकर, सरव्यवस्थापक सचिन पोवार, दिवाळी अंकाचे संपादन करणाऱ्या श्रमी भोंसुले तसेच सुनिल प्रमोद भोंसुले, आणि ऱ्हया पाटील यांचे वडील दत्ता पाटील हे उपस्थित होते.

किरण ठाकुर यांनी उत्कृष्ट दिवाळी अंक प्रकाशित केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आणि दैनिक तरुण भारतच्या गोव्यातील 4 दशकांच्या सेवेचा आढावा घेतला. तरुण भारत गोवा आवृत्ती यंदा आपल्या सेवेची 40 वर्षे पूर्ण करीत आहे. त्याबद्दल राज्यातील जनतेचेही त्यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article