For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्यवर्ती कुस्त्यांच्या पत्रकाचे प्रकाशन

09:47 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
मध्यवर्ती कुस्त्यांच्या पत्रकाचे प्रकाशन
Advertisement

3 मार्चला होणार कुस्त्यांचे मैदान

Advertisement

बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव आयोजित आनंदवाडी आखाडात बेळगाव येथे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. आनंदवाडी आखाड्यात आयोजित कार्यक्रमात पत्रक प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे  परशूरामभाऊ नंदिहळ्ळी,  श्रीराम बिल्डर्स डेव्हलपर्स इंजिनिअरिंग गोविंद टक्केकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्ष मारूती घाडी, संतोष होंगल, नवरत्नसिंग पनवार, हिरालाल चव्हाण, अशोक हलगेकर, वाय पी नाईक, सुरज घाडी, भरमा पुणुजगौडा, नरहरी माळवी, सुहास हूद्दार, भावेश बिर्जे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना गोविंद टक्केकर म्हणाले की बेळगाव तालुका व जिल्हातील नवोदित कुस्तीपटूना प्रोत्साहन देण्यासाठी व  बेळगावमध्ये कुस्ती परंपरा टिकवून ठेवण्यासाठी कुस्तीत बेळगावचे नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच युवकांच्या बरोबर महिलांना ही प्रोत्साहन देण्यासाठी 30 हून अधिक महिला कुस्त्या आयोजीत करण्यात आल्या आहेत. तरी या सुवर्णसंधीचा लाभ कुस्तीशौकीनांनी व मल्लानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.