For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'सार्वजनिक बांधकाम' ने रोडमॅपनुसार काम करावे

03:07 PM Jan 17, 2025 IST | Radhika Patil
 सार्वजनिक बांधकाम  ने  रोडमॅपनुसार काम करावे
Advertisement

सातारा : 

Advertisement

राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु असलेली कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. सर्व कामे दर्जेदार होण्यासाठी प्रत्येकाने स्वत: लक्ष घालावे. प्रस्तावित विकासकामे करण्यासाठी पुढील 100 दिवसांचा नियोजन आराखडा तयार करून नियोजनबद्ध रोड मॅप तयार करा आणि त्यानुसार कामकाज करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, मालवण येथे नव्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून या कामाबाबतचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका सुरु केला आहे. मंत्रालयात बांधकाम खात्याच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी आज प्रादेशिक कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. बैठकीला बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव एस. डी. देशपुते यांच्यासह विभागाचे मुख्य अभियंता व संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पणन विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पर्यटन विभाग व माहिती व जनसंपर्क संचालनालय या विभागांचा 100 दिवसांचा नियोजन आराखडा बैठक घेतली होती. या पार्श्वभूमीवर मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रादेशिक आढावा बैठक घेतली. बैठकीत राज्यभरात बांधकाम विभागामार्फत सुरु असलेली कामे आणि पुढे करावयाची प्रस्तावित कामे याचा सविस्तर आढावा घेतला. या मॅरेथॉन बैठकीत त्यांनी राज्यातील सर्व जिल्हानिहाय सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली. विविध प्रकारचे रस्ते, शासकीय, निमशासकीय इमारती बांधकाम व इतर सर्व कामांची सद्यस्थिती जाणून घेऊन सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण येथील पुतळा दुर्घटनेनंतर याठिकाणी नव्याने छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या कामासंदर्भातही मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या.

Advertisement
Tags :

.