महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कथामाला मालवणच्या सुरेश ठाकूरांना लोकसेवा पुरस्कार जाहीर

05:08 PM Jan 10, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आचरा प्रतिनिधी

Advertisement

गेली 26 वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकसेवा समिती डोंबिवली या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा २०२४ सालचा लोकसेवा पुरस्कार साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांना जाहीर झाला आहे. यंदाचा हा पुरस्कार शिक्षण-साहित्य आणि पत्रकारिता यासाठी सुरेश ठाकूर यांना देण्यात येणार आहे. संस्थेच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य कोकण महोत्सवात हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते रविवार दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजता अरुणोदय सोसायटी मैदान (चिनार), महात्मा फुले रोड (डोंबिवली पश्चिम) येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

Advertisement

सन १९७२ पासून सुरेश ठाकूर सानेगुरुजी कथामालेचे कार्य तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम अविरतपणे करत आहेत. "सानेगुरुजींच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात मला लोकसेवा पुरस्कार मिळाला हे माझे सौभाग्य आहे," अशी भावना ठाकूर गुरुजींनी हा पुरस्कार जाहीर झाल्यावर व्यक्त केली. सुरेश ठाकूर यांना मिळालेल्या ह्या पुरस्काराबद्दल अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला परिवार, कोकण मराठी साहित्य परिषद परिवार, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार समिती, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
# MALVAN # Public Service Award announced to Suresh Thakur# ACHRA #
Next Article